शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

लिफ्ट इरीगेशन सुरू करा

By admin | Updated: February 13, 2017 00:25 IST

भविष्यात शिरपूरबांध धरणातील पाणी चिचगड परिसरात पडले तर संपूर्ण तालुका हा सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होईल.

सहषराम कोरोटे : टोयागोंदी येथे क्लोज प्रौढ कबड्डी स्पर्धा देवरी : भविष्यात शिरपूरबांध धरणातील पाणी चिचगड परिसरात पडले तर संपूर्ण तालुका हा सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होईल. त्यासाठी लिफ्ट एरीकेशन त्वरित सुरू करण्यात यावे, असी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले. ते देवरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम गाव टोयागोंदी येथे क्लोज प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले, टोयागोंदी गावातील अनेक शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती सिरपूर (बांध) धरणात गेली. परंतु या धरणातील एक बुंद पाणी देवरी तालुक्यातील एकही शेतकऱ्यांना मिळत नाही. या धरणातील पाण्याचा उपयोग फक्त मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना होत आहे. या भागातील शेतकऱ्यांची जमीन ही सुपीक आणि त्यांना या जमिनीतून रबी व खरीप हंगामातील पीक घेणे सोईस्कर असतानाही या उलट या धरणातील पाण्यापासून देवरी तालुका येथील शेतकरी वंचित झाला आहे. या गंभीर मुद्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचार करुन आणि पुढाकार घेवून या धरणावर लिफ्ट एरीकेशन त्वरित सुरू करण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आज देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेवून बेरोजगाराचे जीवन जगत आहेत. त्यांच्या हातांना कोणतेही काम नाही. ते कामाच्या शोधात इतरत्र भटकत आहेत. तरी या गंभीर बाबीकडे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत. यासाठी आता शासनाने स्वत: पुढाकार घेवून देवरी तालुक्यात एक मोठे उद्योग त्वरित सुरू करुन येथील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेही कोरोटे म्हणाले. उद्घाटन सहषराम कोरोटे यांच्या हस्ते, नकटीचे सरपंच पुस्तकला मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी मंचावर उपसरपंच तेजराम गावळे, ग्रामपंचायत सदस्य कांता लांज़ेवार, निळा मडावी, भोजराज नेताम, पोलीस पाटील प्रतिमा राऊत, जि.प. शाळेचे राऊत, अंगणवाडी सेविका हेमलता लांजेवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव आचले. भर्रेगावचे डॉ. पाटील, काँग्रेस कार्यकर्ते बळीराम कोटवार, माजी सरपंच धनपत भोयर, भिवाराम इंगोले, शामलाल काटेंगे, ओमप्रकाश राऊत, सुरेंद्र राऊत, सदाराम नंदेश्वर, विजय राऊत, संध्या वालदे, दिनेश राऊत, अनिल राऊत व रोजगार सेवक धनराज बहेकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन नामदेव आचले यांनी केले. आभार बंटी गावळे यांनी मानले. कार्यक्रमात परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.