शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एसटीची सेवा सुरळीत सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

एसटी महामंडळातील कर्मचारी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्रस्त आहेत. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कर्मचाऱ्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पगार थकत असल्याने एसटी कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. शिवाय जीव धोक्यात घालून सेवा देऊनही त्यांना राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे काहीच सुविधा नाहीत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात रोष आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवापासून (दि. २७) बेमुदत उपोषण छेडले आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी एसटीची सेवा बंद आहे. मात्र या उपोषणाचे जिल्ह्यात काहीच परिणाम दिसून आले नसून एसटीची सेवा सुरळीत सुरू आहे. एसटी महामंडळातील कर्मचारी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे त्रस्त आहेत. त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कर्मचाऱ्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार पगार थकत असल्याने एसटी कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. शिवाय जीव धोक्यात घालून सेवा देऊनही त्यांना राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे काहीच सुविधा नाहीत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात रोष आहे. विशेष म्हणजे, वारंवार पगार थकत असून आता दिवाळी तोंडावर असताना ऑक्टोबर महिन्याच्या पगाराबाबत काहीच सांगणे कठीण आहे. या व अन्य कारणांमुळे कर्मचारी संतप्त असून महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने बुधवारपासून (दि. २८) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या उपोषणांतर्गत राज्यातील काही ठिकाणी एसटीची सेवा कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारातील एसटीची सेवा सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे आता ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय झाली नाही. 

या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या - एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी द्यावा, वाढीव घरभाडे ८, १६, २४ या दराने द्यावे, सर्व सण उचल १२ हजार ५०० रुपये द्यावे, वार्षिक वेतन वाढ २ टक्के वरून ३ टक्के द्यावी, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन द्यावे, दिवाळी बोनस १५ हजार रुपये द्यावे आदी मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण केले जात आहे.

 

टॅग्स :state transportएसटी