देवरी : गोंदिया आगाराकडून देवरी-आमगाव-गोंदिया मार्गावर समान संतराकरीता दररोज वेगवेगळे तिकिट दर आकारुन प्रवाश्यांची लूट केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत काही प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे तक्रारीही केल्या आहेत.देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी हा गैरप्रकार उघडकीस आणला. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, त्यांच्याकडे १० टक्के सवलतीचे वार्षिक कार्ड असून त्यांनी या कार्डांचा उपयोग करीत दि. २४ डिसेंबरला देवरी ते गोंदिया प्रवास केला. तेव्हा देवरी ते आमगावकरीता ४० रुपये द्यावे लागले. आमगाववरुन गोंदियाकरीता तिकिट क्र. ९३९८८ नुसार २९ रुपये तिकिटदर घेण्यात आले. परंतु दि. २५ डिसेंबरला तिकिट क्र. १७४७२ नुसार त्यांच्याकडून ३४ रुपये घेण्यात आले. यावर त्यांनी वाहकाला विचारले असता, माझ्या मशीनमधून ३४ रुपयाचेच तिकिट मिळणार असे म्हणून त्यांनी ५ रुपये अतिरिक्त घेवून तिकिट दिले. आगार प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे जैन यांना २४ डिसेंबरला नरेश जैन यांना गोंदिया ते आमगाव व आमगाव ते गोंंदियाकरीता पाच रुपयासाठी २९ रुपये लागतात. २५ डिसेंबरला गोंंदिया ते आमगावकरीता सहा रुपये दर्शवून समान अंतर असून सुद्धा ३४ रुपये घेतले जातात. त्याचप्रमाणे साकोली आगाराची बसेस आमगाव ते पदमपूर ०.५ टप्पे करीता ६ रुपये तिकिट दर आकारत आहे. गोंदिया आगार आमगाव ते पदमपूर या ३ किमी च्या अंतराकरीता १.५ टप्पे तिकिटांवर दर्शवून ९ रुपये घेवून प्रवाशांची लुट करीत आहे. साकोली व गडचिरोली आगारांच्या बसेस देवरी ते आमगावचे तिकिट भाडे ३४ रुपये आकारत आहेत. गोंदिया आगार याच समान अंतराकरीता ४० रुपये तिकिटभाडे आकारत आहेत. याबद्दल जैन यांनी आगार प्रमुख गोंदिया तसेच विभागीय नियंत्रक भंडारा यांच्याकडे तक्रार केली, परंतु अजुनपर्यंत याकडे एस.टी. विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे देवरी आमगाव गोंदियाच्या मार्गावर विविध वेळेनुसार १९ बसेस चालतात. त्यापैकी १७ बसेस आमगावमार्गे जात असून त्यापैकी २ ते ३ बसेस आमगाव येथील नवीन बसस्थानकावर जात असतात. बाकी सर्व बसेस नवीन बसस्थानकावर जात असून सुद्धा नवीन बसस्थानकाच्या अंतराचे भाडे गोंदिया आगार प्रवाश्यांकडून घेवून त्यांची लुट करीत आहे.गोंदिया आगारांकडून दररोज होत असलेली प्रवाशांची लूट थांबविण्याकरीता विभागीय नियंत्रकाने लक्ष घालावे, अशी मागणी नरेश जैन यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
एसटी प्रवाश्यांची पिळवणूक
By admin | Updated: December 27, 2014 02:09 IST