शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची सवलत बंद होणार नाही; सर्वच योजना सुरु राहतील

By अंकुश गुंडावार | Updated: February 21, 2025 17:13 IST

एकनाथ शिंदे : मुख्यमंत्र्यांसोबत कोल्ड वॉर नाही

गोंदिया : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलतीची योजना बंद होणार अशी अफवा विरोधकांकडून पसवून जनतेत भ्रम निर्माण केला जात आहे. पण हे महायुतीचे सरकार जनतेचे सरकार असून सुरु केलेली एकही योजना बंद करणार नाही. एसटीची सवलत बंद होणार नाही, सर्वच योजना सुरुच राहतील अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

देवरी येथे शुक्रवारी (दि.२१) शिंदेसेनेतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा व माजी आ. सहषराम कोरोटे यांच्या पक्ष कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आ. नरेंद्र भोंडेकर, माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम कोरोटे, शिंदेसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, मुकेश शिवहरे, युवा नेते डॉ. सुगत चंद्रिकापुरे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते महायुतीने सुरु केलेल्या सवलतीच्या योजना बंद होतील असा भ्रम निर्माण करुन जनतेचे दिशाभूल करीत आहे. लोकसभा निवडणुकीत सुध्दा विरोधकांनी संविधानाच्या नावावर जनतेची दिशाभूल केली. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी त्यांची जागा दाखवून दिली. महायुती सरकारने सुरु केलेल्या कुठल्याही सवलतीच्या योजना बंद होणार नसून त्या पुर्ववत सुरुच राहतील असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आजपर्यंत अनेक पदव्या, पुरस्कार मिळाले पण लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सर्वात मोठी ओळख असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ये फेव्हीकल का जोड है !मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्ड वॉर सुरु असल्याची अफवा पसरविली जात आहे. पण ही केवळ अफवाच असून मुख्यमंत्र्यांसोबत कुठलाच कोल्ड वॉर सुरु नाही. आमच्यात योग्य समन्वय असून आम्ही सोबत राहून पुढील अनेक लढया लढू, ये फेव्हीकल का जोड है टूटेगा नही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाgondiya-acगोंदिया