शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एसटी आणि रेल्वेत वाढत आहे प्रवाशांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील सुमारे दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिथिलता देण्यात ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील सुमारे दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिथिलता देण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.७) जिल्ह्यात अनलॉकची अंमलबजावणी करण्यात आली असून प्रवासी सेवाही सुरू झाली आहे. जिल्ह्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव व अनलॉकमुळे आता नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. परिणामी नागरिक आता आपल्या कामांसाठी घराबाहेर पडत असताना दिसत आहे. यामुळे आता एसटी आणि रेल्वेने प्रवासही त्यांनी सुरू केला असल्याने एसटी आणि रेल्वेत वर्दळ होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात नागरिकांना प्रवासासाठी एसटी व रेल्वे मार्ग हे दोघेही सोयीस्कर पडत असल्याने नागरिक आपल्या सोयीने प्रवासाला प्राधान्य देत आहेत. मात्र एसटीच्या फेऱ्या आता हळ‌ूवार वाढत असून शुकशुकाट असलेल्या बस स्थानकावर व रेल्वे स्थानकावरही नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे.

-----------------------------

- जिल्ह्यात रोज एसटीच्या फेऱ्या- ५०

- रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - ३००- ५००

- धावणाऱ्या रेल्वेंची संख्या- ३७

- प्रवासी - दोन हजार

-----------------------

एसटीत नागपूर मार्गावर गर्दी

गोंदिया आगारासाठी नागपूर मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावर बाराही महिने प्रवासी राहतात. कारण, एसटीने नागपूरला जाताना भंडारा जिल्हा पडत असून पूर्वी गोंदिया जिल्हा भंडारातच येत असल्याने आजही कित्येक विभागांच्या कार्यालयांचा कारभार आजही तेथूनच चालत आहे. पुढे नागपूर येथे शिक्षण, उपचार, खरेदी तसेच मुख्य कार्यालय असल्याने कामकाजासाठी नागपूरला ये-जा असतेच.

---------------------------

रेल्वेच्या मुंबई मार्गावर गर्दी

राज्याचा संपूर्ण कारभारच मुंबई येथून चालत असल्याने शासकीय अधिकारी-कर्मचारी म्हणा, येथील व्यापारी किंवा नेते मंडळी यांना मुंबई गाठावीच लागते. शासकीय कामकाजासाठी अधिकाऱ्यांचे दौरे नेहमीच सुरू असतात. तर गोंदिया शहराला मिनी मुंबई म्हटले जात असून मोठी बाजारपेठ असल्याने व्यापारी व्यवसाय व खरेदीसाठी मुंबईला ये-जा करत असतात.

---------------------------

प्रवासी कोट

मागील सुमारे दोन महिन्यांपासून कामकाज ठप्प पडले होते. आता मात्र कोरोना नियंत्रणात आल्याने त्यातच अनलॉक झाल्याने कामकाज सुरू करावे लागेल. त्यामुळे एसटीने आता प्रवास सुरू केला आहे.

- घनशाम दमाहे (बस प्रवासी)

--------------------

लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प पडला आहे. प्रवास करता येत नसल्याने चांगलेच नुकसान झाले आहे. मात्र आता घरी बसून राहणे शक्य नसल्याने व शासनाने शिथिलता दिल्याने आता कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे कामानिमित्त प्रवास करावा लागत आहे.

- कुवरलाल पटले (बस प्रवासी)

--------------------------------

नोकरीनिमित्त आम्हाला अपडाऊन करावे लागते. लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद असल्याने दुचाकीने प्रवास करावा लागत होता. मात्र ते परवडणारे नाही. आता रेल्वे सुरू झाल्याने आमची सोय झाली आहे.

- राजेश शहारे (रेल्वे प्रवासी)

----------------------------------

रेल्वे बंद असल्याने आता खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. ते सुरक्षित नसून खिशाला परवडणारेही नाही. आता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असून रेल्वे सुरू झाल्याने प्रवासाची सुविधा झाली आहे.

- अरूण उपासे (रेल्वे प्रवासी)

--------------------------------------

कोट

जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याने आता शिथिलता मिळाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. परिणामी बसस्थानकातच उभ्या असलेल्या एसटी आता धावू लागल्या आहेत. अत्यावश्यक कामे शिवाय आता सामान्य नागरिकही आपल्या कामाला लागले असून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे.

- संजना पटले

आगार प्रमुख, गोंदिया.

---------------------------------

कोट

रेल्वेने १ जूनपासून काही लोकल गाड्या सुरु केल्या आहे. तर हावडा मुंबई मार्गावरच्या नियमित गाड्या सुरु आहे. मागील तीन चार दिवसांपासून रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. अनलॉक झाल्यानंतर आता पुन्हा प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्या दृष्टीने नियोजन सुरु आहे.

- ए.के.राय, जनसंपर्क अधिकारी.