शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाताची रोवणी पट्टा पद्धतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुक्यात सर्वत्र भात रोवणीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील वर्षीचा हंगाम पाहता धान पिकावर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. सलगच्या तालुक्यात गादमाशीचा प्रादुर्भाव जाणवला होता. या बाबी विचारात घेऊन यंदाच्या खरीप हंगामात धानपिकांची तांत्रिक पद्धतीने काळजी घेतल्यास तसेच रोवणी पद्धतीत बदल करुन पट्टा ...

ठळक मुद्देकृषी विभागाचा सल्ला : कीडरोगावर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तालुक्यात सर्वत्र भात रोवणीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील वर्षीचा हंगाम पाहता धान पिकावर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. सलगच्या तालुक्यात गादमाशीचा प्रादुर्भाव जाणवला होता. या बाबी विचारात घेऊन यंदाच्या खरीप हंगामात धानपिकांची तांत्रिक पद्धतीने काळजी घेतल्यास तसेच रोवणी पद्धतीत बदल करुन पट्टा पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला.कृषी विभागाने दिलेल्या पत्रकानुसार, पट्टा पद्धतीने धानाची रोवणी केल्यास धान पिकाचे तुडतुड्यापासून व्यवस्थापन करुन चांगले उत्पादन घेता येते. याकरिता सेंद्रीय खताचा, हिरवळीच्या खताचा, गराडीच्या पानाचा, जैविक खतांचा व रासायनिक खतांचा किटकनाशकाचा शिफारसीप्रमाणे योग्य प्रमाणात काळजी घेऊन वापर करावा. पट्टा पद्धतीने रोवणी केल्यास पट्ट्याची ३० ते ४० सेमी मोकळी जागा सोडण्यात येत असल्याने सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो. तसेच हवा खेळती राहत असल्याने तुडतुड्याच्या वाढीस व प्रसारास नैसर्गिक अडथळा निर्माण होतो.त्याचप्राणे मोकळ्या पट्ट्यातून पिकांचे निरीक्षण करणे, फवारणी करणे तसेच धान बिजोत्पादकांना भेसळ काढणे सहज शक्य होते. शेतकºयांनी कीडरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भात पिकाची पट्टा पद्धतीने रोवणी करण्यासाठी पुढे यावे. याकरिता शेतकºयांनी लवकर येणाºया धान २० गुणीला २० सेमी अंतरावर तसेच मध्यम व उशिरा कालावधीच्या वाणांची २५ गुणीला २५ सेमी अंतरावर प्रती २ ते ३ रोप घेऊन दोरीच्या सहाय्याने उथक व सरळ रोवणी करावी.तसेच १० ओळी सलग झाल्यानंतर ३० ते ४० सेमी अंतर सोडावे किंवा १० फूट रोवणी झाल्यानंतर ३० ते ४० सेमी अंतर सोडून पुन्हा रोवणीस सुरुवात करावी. पट्टा पद्धती शेतकºयांना परवडणारी असून उत्पादनात वाढ होत असल्याने भाताची रोवणी पट्टा पद्धतीने करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी