स्पर्धा महिलांची : संजना, पूजा, अल्का व वैशाली ठरल्या विजेत्याआमगाव : लोकमत सखी मंचच्या वतीने ३ आॅगस्ट रोजी विद्यानिकेतन कॉन्व्हेंट आमगाव येथे रक्षाबंधननिमित्त महिलांसाठी राखी बनवा व पूजेचे ताट सजवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमात अतिथी व परीक्षक म्हणून प्रभा माहेश्वरी व किरण अग्रवाल उपस्थित होत्या. प्रार्थना गीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सर्वप्रथम उपस्थित महिलांना एकदुसऱ्यांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राखी बनवा स्पर्धेत संजना असाटी प्रथम व अल्का अग्रवाल यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच पूजेचे ताट सजवा स्पर्धेत पूजा अग्रवाल प्रथम व संजना असाटी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी श्रावण महिन्याच्या निमित्ताने ठरविलेल्या वेळी भगवान शिव जास्तीत जास्त नाव लिहिण्याच्या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यात वैशाली सरनाईक विजेत्या ठरल्या. सर्व विजेत्या महिलांना अतिथींच्या हस्ते पुरस्कार वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संयोजिका वर्षा शर्मा यांनी केले. कार्यक्रमात चित्रा जांगडे, ज्योती बोरकर, राखी खंडेलवाल, पुष्पा असाटी, स्मिता असाटी, सुनिता येटरे, रानी असाटी, आरती असाटी, भारती काळबांधे, नेहा मिश्रा, रिंपी उकरे, सरिता अग्रवाल, रेणू अग्रवाल, वैशाली तिराले व मोठ्या संख्येने सखी मंचचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राखी बनवा व ताट सजवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: August 4, 2014 23:50 IST