शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकची पोलिसांच्या वाहनाला धडक; एक ठार

By नरेश रहिले | Updated: July 3, 2024 20:37 IST

मासुकसा घाटावरील घटना: पोलीस उपनिरीक्षक व चालक पोलिस बालबाल बचावले

नरेश रहिले, गोंदिया: देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासुलकसा घाटावर भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रकने राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या वाहनाला जब्बर धडक दिल्याने एक पोलीस कर्मचारी ठार झाल्याची घटना ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.मनीष बहेलीया (३२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासुलकसा घाटावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्यासाठी जात होते. महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगाव केंद्र कॅम्प डुग्गीपारचे महामार्ग पोलिस पोलीस उपनिरीक्षक दिनेश लिल्हारे, वाहन चालवितांना योगेश बनोटे व मागे बसलेला मनीष बहेलीया (३२) घाटावर पोहचले.

यावेळी पाईप घेऊन जाणार ट्रॅक क्रमांक सीजी०८ एके १४०२ ने भरधाव वेगात चालवून त्याने महामार्ग वाहतूक पोलिसांच्या गाडी क्रमांक एमएच १२ आर टी ९६२५ ला जोरदार धडक दिली. या कारमध्ये बसलेले पोलिस कर्मचारी मनीष बहेलीया (३२) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात आणताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेसंदर्भात देवरी पोलिस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया करीत आहेत.चार वाहनांना धडक; चालक होता मद्याच्या धुंदीत

मध्याच्या धुंदीत ट्रकचालक रायपूर कडून नागपूरकडे लोखंडी पाईप घेऊन जात होता. ट्रक चालकाने मद्याच्या धुंदीत चार वाहनांना धडक दिली. पोलीस वाहनाला धडक दिल्याने एक पोलिस ठार झाला. पोलीस वाहनानंतर एका ट्रॅव्हल्स धडक दिली. ट्रॅव्हल्सच्या काचा फुटल्या. त्यानंतर स्कार्पीओ वाहनाला धडक दिली. शेवटी एका ट्रकला त्या ट्रने धडक दिली. या धडकेत चारही वाहनांचे नुकसान झाले. देवरी पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Accidentअपघात