शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या-नव्या गाण्यांच्या तालावर रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

विजय मानकर सालेकसा: यंदा पावसाने मधात दडी मारल्याने भात रोवणीला उशिरा सुरुवात झाली असून, मागील तीन-चार दिवसांपासून येत असलेल्या ...

विजय मानकर

सालेकसा: यंदा पावसाने मधात दडी मारल्याने भात रोवणीला उशिरा सुरुवात झाली असून, मागील तीन-चार दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे जवळपास सर्वत्र ठिकाणी भात रोवणीला वेेग आला आहे. रोवणीच्या कामात वाटू नये म्हणून मनोरंजन म्हणून जुन्या-नव्या गाण्यांच्या तालावर रोवणी करताना मजूर (महिला शेतकरी) प्रत्येक शेतावर दिसून येत आहेत.

पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण क्षेत्र भात लागवडीचे असून, या भागातील शेतकऱ्यांना वेळेवर भात रोवणी व्हावी, यासाठी नियोजन करावे लागते. वर्षभराची कमाई भात रोवणीमध्ये दडलेली असून, शेतकरी कुटुंब महिनाभरापूर्वीपासून तयारीला लागत असतो. ८ जूनला मृग नक्षत्र लागताच धान पेरणीची तयारी, त्यानंतर पऱ्हे टाकून झाल्यानंतर एकीकडे नर्सरीची देखभाल तर दुसरीकडे शेतीला नांगरणी करण्याची कामे करतात. आधी सर्वत्र बैल नांगराने शेती वाहण्याचे कार्य केले जात असायचे; पण आता ट्रॅक्टरने नांगरणी व चिखलणी केली जाते. आजही अनेक छोटे शेतकरी बैल नांगराचा उपयोग करीत आहेत. यंदा मृग नक्षत्रात थोडाफार पाऊस आला; परंतु ऐन रोवणीची वेळ येताच पावसाने दडी मारली. जुलै महिन्यात वेळेवर पाऊस पडला तर सर्वत्र शेतीमध्ये रोवणीचे काम सुरू होते. एकीकडे नांगरणी तर दुसरीकडे पऱ्हे काढणे आणि सोबतच गाण्यांच्या तालावर रोवणी करताना प्रौढ महिला व युवा तरुणी सहभागी होतात. प्रौढ आणि म्हाताऱ्या महिला पारंपरिक गाणी आपल्या ताला-सुरात गातात. त्यांच्या गाण्यांमध्ये अर्थ व बोध असतो. गीताच्या स्वरूपात दंतकथा लपलेली असते. पारंपरिक जुन्या गाण्यांमध्ये गोडवा असून, मुलीच्या माहेरची व सासरची रुढी परंपरांचा उल्लेख असतो. मुलीला दिलेली शिकवण लपलेली असते. पहाटे उठून स्वयंपाक करणे, शिदोरी घेऊन जाणे व रोवणा संपला की माहेरी जाते. या गोष्टी त्यांच्या पारंपरिक गीतात समाविष्ट असतात.

..................

मोऱ्या झाला कालबाह्य

शेतात काम करीत असताना शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी आधी मोऱ्या पांघरुन कामे करावी लागत असत. रोवण्या रोवणाऱ्या महिलांना दिवसभर चिखलात खपून राहावे लागत असून, पावसापासून वाचून राहण्यासाठी माहूर पानाच्या आच्छादान असलेल्या मोऱ्या उबदार वाटायच्या; परंतु आता उबदार माहुरपानाचा मोऱ्या कालबाह्य झाला असून, कमरेला प्लास्टिक बांधून रोवणी करतात. पाऊस आला की प्लास्टिकची पांघरून रोवणी करायची नाही तर मोकळे होऊन उत्साहात भात लागवड करायची. दरम्यान म्हाताऱ्या महिलांची गाणी संपली की तरुण मुली नव्या युगाची गीते गातांना रोवणी करताना दिसतात.