गोंदिया : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांचे छायाचित्र मतदार ओळखपत्रातील माहिती व यूआयडीएआयची आधार कार्डमधील माहिती यांची सांगड घालणे, मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नाव ेवगळणे, छायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करुन प्रमाणित मतदार याद्या तयार करण्यासाठी जिल्ह्यात विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी येत्या १७ मे, २१ जून व १२ जुलै २०१५ या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व मतदान केंद्र व तहसील कार्यालयातील मतदार मदत केंद्रावर आयोजित या विशेष मोहिमेमध्ये मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना ७, मतदार यादीतील तपशिलात बदल करण्यासाठी नमुना ८, विधानसभा मतदार संघा अंतर्गत पत्ता बदल करण्यासाठी नमुना ८ अ, मतदार ओळखपत्र क्रमांक व आधार क्रमांक यांची सांगड घालण्याचा अर्ज सादर करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले. (जिल्हा प्रतिनिधी)
मतदार याद्या दुरुस्ती व प्रमाणीकरणासाठी विशेष कार्यक्रम
By admin | Updated: April 30, 2015 01:00 IST