गोंदिया : गोंदिया तालुक्यातील मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१५ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे विशेष पुर्नरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. १ डिसेंबर २०१४ रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करणे, १ डिसेंबर २०१४ ते १६ डिसेंबर २०१४ पर्यंत द्यावे व हरकती स्विकारणे, ७ डिसेंबर २०१४ व १४ डिसेंबर २०१४ रोजी विशेष मोहीम घेण्यात येईल. या विशेष मोहिमेंतर्गत दि.७ व १४ डिसेंबर रोजी मतदान केंद्रीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहतील. मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नसतील त्यांनी नमूना ६, वयाचा व रहिवासी दाखल सादर करुन मतदार यादीत नाव नोंदवावे. मतदारांजवळील निवडणूक ओळखपत्र म्हणजे मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा होत नसून मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. त्याकरिता या विशेष मोहिमेंअतर्गत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
७ व १४ डिसेंबरला मतदार नोंदणीची विशेष मोहीम
By admin | Updated: November 29, 2014 01:34 IST