शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वृत्त प्रकाशित होताच महेशला मदतीचा ओघ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

शुक्रवारच्या (दि.१९) अंकात लोकमतने दहा वर्षाचा मुलगा ओढतो कुटुंबाचा गाडा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी लोकामतशी संपर्क साधून महेशच्या कुटुंबाला मदत करण्याची तयारी दर्शविली.तर काहींनी थेट महेशचे घर गाठून पैशाची आणि अन्नधान्याची मदत केली. लोकमतने त्याचे बालपण वाचवा अशी मार्मिक हाक दिल्यावर अनेक दानशुर मदतीसाठी पुढे आले.

ठळक मुद्देरामलालने मानले लोकमतचे आभार : मदत करण्यासाठी अनेकांनी गाठले महेशचे घर

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तुम्ही देवच दादा. तुम्ही माझ्यासारख्या गरीब माणसाची समस्या लोकमतमध्ये छापली. तुमच्यामुळेच माझ्या उद्ध्वस्त आयुष्यात नव्या स्वप्नांची सोनेरी पहाट उजाळली. तुमचे ॠण मी फेडू शकणार नाही. गहिवरलेल्या डोळ्यांनी जड अत:करणाने रामलाल नागरिकर हे बोलत होते. आयुष्य जगताना कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते.याचे भिषण वास्तविक चित्र लोकमतने मांडल्यावर प्रस्तुत प्रतिनिधीला शंभरावर फोन आले. काही फोन रामलालच्या दु:खात सामील होणारे होते. तर काही फोन सढळ हाताने मदत करण्यासाठी होते.शुक्रवारच्या (दि.१९) अंकात लोकमतने दहा वर्षाचा मुलगा ओढतो कुटुंबाचा गाडा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी लोकामतशी संपर्क साधून महेशच्या कुटुंबाला मदत करण्याची तयारी दर्शविली.तर काहींनी थेट महेशचे घर गाठून पैशाची आणि अन्नधान्याची मदत केली. लोकमतने त्याचे बालपण वाचवा अशी मार्मिक हाक दिल्यावर अनेक दानशुर मदतीसाठी पुढे आले. शुक्रवारी सकाळीच सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांनी २५ किलो तांदूळ व पाचशे रूपये देत प्रथम मदतीचा हात पुढे केला. येथील युवा शेतकरी टिटू जैन यांनी पाचशे रूपये, शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलचे प्राचार्य एम.पी.शेख यांनी दोन हजार रु पये, जेष्ठ साहित्यीक विजय कोठेवार यांच्याकडून पाचशे रूपये,नेशन मदर पब्लिक स्कूलचे संस्थापक प्रकाश पचंभाई यांनी आपल्या शाळेत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते सुधीर येळे यांनी पाचशे रूपये, नगर पंचायतचे बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन यांनी पाचशे रूपये, निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेभंरे यांनी २५ किलो तांदूळ, गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नारनवरे यांनी एक हजार रुपये, राहुल जायस्वाल, अमीत रहागझले, कमलेश बारेवार यांनी पाच लीटर तेल देऊन सामाजिक बांधिलकी जपली. शुक्रवारी समाजातील विविध मान्यवरांकडून महेशला मदतीचा ओघ सुरू झाल्याने त्याचे कुटुंबीय सुध्दा भारावून गेले होते. त्यांनी लोकमतचे आभार व्यक्त करीत तुमच्यामुळेच ही मदत मिळाल्याचे सांगितले.गोरेगाव दानवीरांचेच शहरस्वभावातच शातं असलेल्या गोरेगावात सामाजिक बांधिलकी जपणारे पावलोपावली भेटतात. मनापासून प्रत्येक सामाजिक कार्यात येथील नागरिक भाग घेवून सामाजिक एकोपा जपतात. महेश नागरीकर हा दहा वर्षाचा शाळकरी मुलगा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपाला विकत आहे. ही बाबच गोरेगावकरांनी मनावर घेत सढळ हाताने मदतीचे हात पुढे केले. पाहता पाहता मोठी मदत ही झाली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एकीकडे सर्वाचे व्यवसाय डबघाईला आले असताना या परीस्थितीत ही महेशला केलेली मदत लाख मोलाची आहे.महेशच्या शिक्षणाची जबाबदारी माझी - प्राचार्य एम.पी.शेखमहेश रामलाल नागरीकर हा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. अभ्यासात हुशार आहे. तर हार्माेनियम वाजविण्यात तो तरबेज आहे. त्याच्याकडे सुरूवातीपासूनच माझे लक्ष आहे. त्याला जी काही मदत लागेल ती मदत पुरवित आलो आहे. त्याच्या शिक्षणाची जबाबदारी माझी असल्याचे येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलचे प्राचार्य एम.पी.शेख यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.

टॅग्स :Lokmat Impactलोकमत इम्पॅक्ट