शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपद जाताच इच्छुकांच्या आशा पल्लवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 21:42 IST

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच बॅनरमधून नवनवीन चेहरे आता झळकू लागले आहेत. यात काही चेहऱ्यांशी तर राजकारणाशी सोयरसुतक दिसून येत नाही, तर काही ‘ट्राय अगेन’ असे आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्देवेध विधानसभा निवडणुकीचे : भाजपपुढे गड कायम राखण्याचे आव्हान

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच बॅनरमधून नवनवीन चेहरे आता झळकू लागले आहेत. यात काही चेहऱ्यांशी तर राजकारणाशी सोयरसुतक दिसून येत नाही, तर काही ‘ट्राय अगेन’ असे आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. मात्र ऐनवेळी अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.२००८ च्या परिसीमन आयोगाच्या शिफारशीनंतर अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले आहेत. युती शासन काळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. मात्र विधानसभा निवडणुकीला केवळ चार महिने शिल्लक असतांना मंत्रिमंडळ विस्तार झाला व त्यात बडोलेंचे मंत्रिपद गेले.भंडारा गोंदिया विधान परिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. बडोलेंचे मंत्रिपद जाताच अगदी त्याच दिवशी इच्छुकांचे बॅनर सुद्धा झळकले. आगामी विधानसभा निवडणुकीत बडोलेंना उमेदवारी मिळणार की नाही, याचीही मतदारसंघात चर्चा आहे. या मतदारसंघात भाजप व काँग्रेस पक्षाचे अनेक इच्छुक उमेदवारीसाठी शड्डू ठोकून आहेत.लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाला मिळालेली आघाडी टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. तर दोनदा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर उभे ठाकले आहे. गत विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीचे सूत जुळले नाही. परिणामत: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेला स्वबळावर लढण्याची वेळ आली होती. याचा लाभ भाजपाला मिळाला होता. मात्र यावेळी आघाडी हा धोका पत्करण्यास धजावेल अशी परिस्थिती सध्यातरी दिसून येत नाही. मात्र ऐनवेळी काय होईल हे भाकीत करणे तूर्तास चुकीचे ठरेल. यापूर्वी आघाडीची जागा दोनदा काँग्रेसच्या वाट्याला आली होती. या जागेवर २००९ व २०१४ मध्ये भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस या जागेची मागणी करणार असल्याची चर्चा आहे. दावे-प्रतिदाव्यात ही जागा नेमकी कुणाच्या वाट्याला जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.मतदारसंघाचा मागोवाअर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र हा सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्यातील मोहाडी महसूल मंडळ मिळून तयार झाला आहे. २००८ च्या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर २००९ व २०१४ या दोन विधानसभेच्या निवडणुका येथे पार पडल्या. या क्षेत्रात आदिवासींची लोकसंख्या २१.५६ टक्के एवढी आहे. या विधानसभा क्षेत्रात आजवर भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे. २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजकुमार बडोले निवडून आले आहेत.यावेळची विधानसभा निवडणूक मात्र आव्हानात्मक असेल. यावेळी बहुजन वंचित आघाडी कुणाची बिघाडी करेल ते पाहणे रंजक ठरेल. एमआयएम व मनसे या पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक