शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘गंगाबाई’त सोनोग्राफी बंद

By admin | Updated: July 7, 2016 01:57 IST

केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय या दोन्ही ठिकाणी सोनोग्राफी प्रक्रियेचे काम सुरू होते.

बीजीडब्ल्यू रूग्णालय : प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकाच्या निर्णयावर प्रश्नचिन्हगोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय या दोन्ही ठिकाणी सोनोग्राफी प्रक्रियेचे काम सुरू होते. परंतु परंतु प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी एक नवीन आदेश जारी केले. त्यामुळे आता केटीएस रूग्णालयात दोन रेडिओलॉजिस्ट झाले व बाई गंगाबाई महिला रूग्णालयात एकही रेडिओलॉजिस्ट नाही. त्यामुळे महिला रूग्णालयात सोनोग्राफीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडली आहे.या प्रकारामुळे बाई गंगाबाई महिला रूग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या महिलांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर गरजू महिलांना बाहेरून सोनोग्राफी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना अधिकचा आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे.केटीएस जिल्हा रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय ही दोन्ही शासकीय रूग्णालये आहेत. दोन्ही रूग्णालयात गरीब वर्गातील लोक उपचारासाठी येतात. परंतु रूग्णालय व्यवस्थापन या संदर्भात विचार करीत नाही. त्यामुळे रूग्णांना बाहेरच्या उपचाराचा सल्ला दिला जातो. गरीब रूग्णांना नेहमी अकारण आपले खिशे खाली करावे लागतात. नुकतेच डॉ. अमरीश मोहबे यांंना केटीएस जिल्हा रूग्णालयात प्रभारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांचा पदभार सोपविण्यात आला आहे.प्रभार ग्रहण करताच डॉ. मोहबे यांनी केटीएस रूग्णालयात कार्यरत रेडियोलॉजिस्ट डॉ.के.एन. घोडेस्वार यांचे स्थानांतरण बाई गंगाबाई महिला रूग्णालयात केले. तर बाई गंगाबाई महिला रूग्णालयात कार्यरत डॉ.आर.बी. चहांदे यांना केटीएस रूग्णालयात आणले. मात्र डॉ. घोडेस्वार यांनी गंगाबाई महिला रूग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यामुळे केटीएस रूग्णालयात आता दोन सोनोग्राफी तज्ज्ञ चिकित्सा अधिकारी झाले व बाई गंगाबाई महिला रूग्णालयात एकसुद्धा अधिकारी राहिला नाही. त्यामुळे महिला रूग्णालयात सोनग्राफीसाठी येणाऱ्या महिलांना मोठीच समस्या होत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वास्तविकपणे डॉ.के.एन. घोडेस्वार यांना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत केटीएस रूग्णालयात नियुक्त करण्यात आले. तर डॉ.आर.बी. चहांदे चिकित्सा अधिकारी आहेत. त्यांची पोस्टींग केटीएस रूग्णालयात करण्यात आली, मात्र त्यांना प्रतिनियुक्तीवर बीजीडब्ल्यू रूग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांनी आपली प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणीसुद्धा केली नव्हती. अशात सदर निर्णय कसेकाय घेण्यात आले, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आत बीजीडब्ल्यू रूग्णालयातील या समस्येचा निपटारा डॉ. मोहबे कसे करतात, हे पाहावे लागेल. विशेष म्हणजे डॉ. मोहबे यांची नियुक्ती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बाई गंगाबाई महिला रूग्णालयात करण्यात आली आहे. ते प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक बनले आहेत व गोंदिया मेडीकल कॉलेजमध्येसुद्धा एका खोलीनंतर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. मोहबे यांच्या नावाची पाटी लागली आहे. अशाप्रकारे का अनेक ठिकाणी एकाच अधिकाऱ्याच्या नावाचा उपयोग केला जात आहे? डॉ. अमरीश मोहबे यांनी सोनोग्राफी तज्ज्ञाची नियुक्तीसुद्धा याच रितीने करवून घेतली का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र सोनोग्राफीसाठी गैरसोय झालीच, एवढे खरे. (प्रतिनिधी)