लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : येथील तहसीलदार हे मागील आठवडभरापासून सुट्टीवर आहेत. तर ते सुट्टीवर असल्याने त्यांचा चार्ज नायब तहसीलदारांकडे देणे गरजेचे होते. मात्र सध्या स्थितीत कुणाकडे चार्ज नसल्याने तहसील कार्यालयातील कामकाज खोळंबले असून कामासाठी येणाºया नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे.सध्या कर्जमाफी आणि विविध दाखल्यांसाठी नागरिकांची तहसील कार्यालयात वर्दळ आहे. येथील तहसीलदार परळीकर हे मागील आठ दिवसांपासून सुट्टीवर गेले आहेत. ते सुट्टीवर असल्याने त्यांचा चार्ज नायब तहसीलदाराकडे देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भातील कुठलेच लेखी आदेश तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदारांना देण्यात आले नाही. त्यामुळे या कार्यालयातून वितरीत केल्या जाणºया विविध प्रमाणपत्रावर सह्या कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.कार्यालयातील अधिकारी यावरुन एकमेकांकडे बोट दाखवित आहे. येथील काही अधिकाºयांना चार्ज संदर्भात विचारणा केली असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात कुठलेच आदेश नसल्याचे सांगितले. तहसील कार्यालयाशी तालुक्यातील नागरिकांचा विविध कामांने दररोज संपर्क येत असतो. तसेच विविध महत्त्वपूर्ण दाखल्यांवर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांची स्वाक्षरी आवश्यक असते. त्याशिवाय प्रमाणपत्रांचे वितरण करता येत नाही. तालुक्यातील नागरिक कामासाठी तहसील कार्यालयात जात आहे. मात्र त्यांना तहसीलदार सुट्टीवर असल्याने आल्या पावलीच परत जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्याप्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांचा चार्ज नायब तहसीलदारांकडे सोपवून कामे सुरळीत करावी. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गंगाधर परशुरामकर यांनी दिला आहे.
तहसीलदारांचा चार्ज सध्या कुणाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:54 IST
येथील तहसीलदार हे मागील आठवडभरापासून सुट्टीवर आहेत. तर ते सुट्टीवर असल्याने त्यांचा चार्ज नायब तहसीलदारांकडे देणे गरजेचे होते.
तहसीलदारांचा चार्ज सध्या कुणाकडे
ठळक मुद्देकामे खोळबंली : राष्टÑवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा