गोंदिया : तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेची सभा ग्राम कारंजा येथील ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. या सभेत ग्रामपंचायत अंतर्गत विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच समस्यांना घेऊन जिल्हाधिकारी राजेश खवले यांना निवेदन देण्यात आले. यावर खवले यांनी संघटनेच्या सर्व समस्या दूर करुन भविष्यात संघटनेला सर्वप्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना, सरपंच-उपसरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मुनेश रहांगडाले, महासचिव नितीन टेंभरे, सरपंच राखी ठाकरे, धनवंता उपराडे, मिलन रामटेककर, महेंद्र सहारे, ओमेंद्र भांडारकर, कोमल धोटे, कुलदीप पटले, किरण चौधरी, सुनील ब्राम्हणकर, योगेश कंसरे, दिनेश चित्रे, यांच्यासह तालुका अंतर्गत विविध ग्रामपंचायतचे सरपंच-उपसरपंच उपस्थित होते. विशेष म्हणजे, संघटनेच्यावतीने समस्यांना घेऊन आमदार विनोद अग्रवाल, उपमुख्य कार्यपालन अधिकारी पुराम, तसेच गटविकास अधिकारी निर्वाण यांनाही निवेदन देण्यात आले. तसेच तालुका अंतर्गत ग्रामपंचायतच्या विविध प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले नाही तर संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.