शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीसंदर्भातील समस्या वेळीच मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

पूर्व विदर्भात धान खरेदी करताना अभिकर्ता संस्था, तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, तूर्त कॅमेरे लावण्याची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बारदान्याचा अभाव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घ्या. धान विहित वेळेतच खरेदी केले जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी,  शेतकऱ्यांकडून धान खरेदीदरम्यान येणाऱ्या अडचणी व समस्या संबंधित यंत्रणांनी वेळीच मार्गी लावाव्यात, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत खा. प्रफुल्ल पटेल यांनी केल्या.पूर्व विदर्भात धान खरेदी करताना अभिकर्ता संस्था, तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, तूर्त कॅमेरे लावण्याची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बारदान्याचा अभाव असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. यावर भुजबळ यांनी बारदाना पर्याप्त प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. धान खरेदी करताना बारदान्यावर टॅग लावण्याची प्रक्रिया आहे. मात्र, हे टॅग लावण्याची गरज नाही. मशीनने बारदाना शिवण करण्याचे काम गरजेचे नाही अशा सूचना यावेळी केल्या. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धानाची नासाडी झाली होती.  याबाबत उपाययोजना करून यंदा खरेदी करण्यात येणारे धान सुरक्षित राहण्याच्या अनुषंगाने कारवाई करावी असे निर्देश बैठकीत दिले. बैठकीला आ. मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंघला, जिल्हाधिकारी नयना गुंडे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, बाजार समितीचे लोमेश वैद्य, प्रवीण बिसेन, रेखलाल टेंभरे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

गोदामांची समस्या वेळीच दूर करा - धान खरेदी करणाऱ्या अभिकर्ता संस्थांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. खा. प्रफुल्ल पटेल यांनी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदी वेळेत केली जावी.  धान साठवणुकीसाठी गोदामांची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी धानाच्या साठवणुकीचा प्रश्न सोडवावा शेतकऱ्यांची कोणत्याही धान केंद्रावर गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणांनी घेण्याच्या सूचना खा. प्रफुल्ल पटेल यांनी केल्या.  

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलChhagan Bhujbalछगन भुजबळ