शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या शैक्षणिक समस्या सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:54 IST

अर्जुनी : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अखत्यारीत विविध शैक्षणिक समस्या प्रलंबित आहेत. या समस्यांचे निवेदन जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शुक्रवारी (दि.२) शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांना देण्यात आले.

ठळक मुद्देना.गो.गाणार । जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळास आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अखत्यारीत विविध शैक्षणिक समस्या प्रलंबित आहेत. या समस्यांचे निवेदन जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने शुक्रवारी (दि.२) शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांना देण्यात आले. यावर आमदार गाणार यांनी, गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.या वेळी जिल्हा परिषद व्यवस्थापनाने आर.टी.ई.कायदा वेशीवर टांगत अतंराच्या व पायाभूत सुविधांचा विचार न करता इयत्ता पाचवी व आठवीच्या अनाधिकृत तुकड्या सुरू करून अनैसर्गिक स्पर्धा निर्माण केली. परिणामत: अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर अनाधिकृत तुकड्या तात्काळ बंद करून यापुढे अशा तुकड्या उघडण्यात येऊ नयेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियंत्रणात इयत्ता पहिली ते आठवीच्या मोफत पुस्तकांचे वितरण मागील सत्राच्या पटसंख्येच्या आधारे शाळांना सत्राच्या सुरुवातीला झाले. सदोष वितरण पद्धतीमुळे विहीत संख्ये एवढी पुस्तके संबंधित शाळांना प्राप्त न होण्याची फार पूर्वीची समस्या आहे. यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी व्यक्तिगत लक्ष घालावे व या सत्रात कमी गेलेल्या पुस्तकांची पुर्तत: त्वरीत करावी. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे अनुसूचित जातीच्या मुलींना दरवर्षी मोफत सायकल खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेसह अनुदान खाजगी शाळांनाही देण्यात यावे.गोंदिया स्काऊट व गाईड कार्यालय व भविष्य निर्वाह व वेतन पथक कार्यालय यांना नवीन शासकीय ईमारत जयस्तंभ चौक येथे स्थांनातरीत करण्यात परवानगी द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.या समस्यांवर चर्चा करीत शाळांच्या समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन आमदार गाणार यांनी शिष्टमंडळाला दिले.

टॅग्स :Nago Ganarनागो गाणार