शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

जिल्हा परिषदेत सौर कंदील खरेदी घोटाळा

By admin | Updated: July 19, 2014 01:25 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत महिला व बालकल्याण

बंद सौर कंदीलांची खरेदी : निविदा स्वीकारताना वापरले पैशाचे वजनआमगाव : जिल्हा परिषदेअंतर्गत महिला व बालकल्याण विभागाकडून आदिवासी उपाययोजना, सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना शासन योजनेअंतर्गत सौर कंदील वाटप करण्यासाठी सौर कंदील पुरवठादारांकडून खरेदी करण्यात आले. परंतु निविदा काढताना पुरवठादारांना हाताशी घेवून निविदा देण्यात आल्या. त्यामुळे पुरवठादारांनी जिल्हा परिषदेला बंद असलेल्या सौर कंदीलांचा पुरवठा केला. लाभार्थ्यांनी मिळालेले बंद सौर कंदील प्रकल्प विभागाला परत केल्यावर या खरेदीमधील घोटाळा पुढे आला आहे.महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदियाअंतर्गत आदिवासी उपाययोजना, सर्वसाधारण व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना सौर कंदील उपलब्ध करून देण्यासाठी सन २०१३-१४ ला ११ लाख ७६ हजार ९२० रुपयांची निविदा काढली. परंतु निविदा मॅनेज पद्धतीचा अवलंब झाल्याने पुरवठादारांचे भाग्य उजळून निघाले. त्यामुळे पुरवठादारांनी बंद असलेली सौर कंदीलाचा पुरवठा करुन सहमतीने घोळ केला. शासनाच्या उपाययोजनेअंतर्गत आदिवासी, अनुसूचित जाती विशेष घटक या जाती प्रवर्गातील नागरिकांना सौर कंदीलाची मदत पुरवून त्यांच्यादारी प्रकाश पडावा या कल्याणकारी योजनेचे सार्थ आहे. परंतु प्रशासकीय स्तरावर शासनाच्या कल्याणकारी योजनांना स्वत:च्या घश्यात उतरविण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी कसे समोर होतात हे बंद सौर कंदील प्रकरणावरुन पुढे आले आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने आदिवासी उपाययोजनाअंतर्गत लाभार्थ्यांकडून १० टक्के निधी स्विकारुन त्यांना सौर कंदील उपलब्ध करुन देण्यासाठी निविदा काढण्यात आली. यात गोंदिया बालप्रकल्प विभाग १ व २ करिता १४, तिरोडा ८, आमगाव १०, गोरेगाव ८, सालेकसा ७, सडक/अर्जुनी ६, अर्जुनी/मोरगाव ९, देवरी ९ अशा एकूण ७१ सौर कंदीलाकरिता प्रति नग तीन हजार प्रमाणे १ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचे देयक मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प गोंदिया १ व २ करिता सौर कंदील ४०, तिरोडा २३, आमगाव २१, गोरेगाव २१, सालेकसा १३, सडक/अर्जुनी २३, देवरी २१, अशा एकूण १७९ सौर कंदीलांकरिता प्रतिनग ३००० रुपये प्रमाणे ५ लाख ३७ हजार किंमतीचे देयक मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वसाधारण योजनेअंतर्गत गोंदिया प्रकल्पाला १ व २ करिता ४३, तिरोडा २४, आमगाव २३, गोरेगाव २३, सालेकसा १६, सडक/अर्जुनी १९, मोरगाव अर्जुनी २४ व देवरी २२ अशा ११४ सौर कंदीलकरिता प्रतिनग २२४० प्रमाणे ४ लाख ४२ हजार ३२० रुपये किंमतीचे देयक मंजूर करण्यात आले. सौर कंदील पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेने मे एग्रीज एलीड सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड नागपूर निर्मल पॉवर पुणे या कंपनीच्या नावाने निविदा काढण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेने अटी शर्तीअंतर्गत १२ फेब्रुवारी २०१४ व ३ मार्च २०१४ ला सौरकंदील पुरवठा करण्यासाठी पुरवठादारांना पत्र देण्यात आले. परंतु पुरवठादारांसोबत संगणमत करुन अटी शर्र्तींना धाब्यावर घालून सौर कंदील पुरवठा स्विकारण्यात आले. अधिकाऱ्यांनीही बंद सौर कंदील स्विकारुन जिल्ह्यात प्रकल्प कार्यालयांना पुरवठा केले. त्यामुळे लाभार्थ्यांनी सौर कंदीलासाठी लागणारे १० टक्के हिस्सावाटे देून कंदील प्राप्त केला. प्रत्यक्षात त्यांचा वापर सुरू करताना ते सुरुच झाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना तक्रार केली व दुरुस्तीकरिता प्रयत्न चालवले. परंतु सौर ऊर्जा कंदील सुरूच झाले नाही. आता अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची फसवणूक केल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली. सौर कंदीलचा पूर्ण पुरवठा करण्यात आल्याचे उघड झाले. (शहर प्रतिनिधी)