शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीतील पोषक तत्त्वे झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:03 IST

आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण्याची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्देपरिणाम रासायनिक खतांचा : पशुपालन नामशेष अन् शेणखताकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण्याची शक्यता बळावली आहे.किमान १० वर्षांपूर्वी शेतकरीशेती व्यवसायाबरोबर गाय, म्हैस, बैल, शेळ््या आदी पाळीव जनावरे पाळत होते. शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही त्यांचा वापर होत होता. या पाळीव जनावरांची विष्ठा शेतीसाठी शेणखत म्हणून उपयोगात येत होती. या जनावरांची विष्ठाच खताचे काम करीत होती.शेणखत जमिनीसाठी अत्यंत पोषक ठरत होते. त्यामुळे शेतजमिनीतील पोषक तत्वांना बळ मिळत होते. जमिनीतील पोषक तत्वांना शेणखतापासून कोणतीही हानी पोहोचत नव्हती. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. परिणामी उत्पादनाचा दर्जाही अत्यंत चांगला राहत होता. पीक कसदार निपजत होते. त्यामुळे मनुष्यालाही कसदार अन्न मिळत होते.शेणखतामुळे शेतीत उत्पन्नही भरपूर होत होते. विशेष म्हणजे, ते सर्व कसदार राहत होते. पूर्वी शेतकरी खंडीचा हिशेब लावून, खंडीने उत्पन्न झाले, अशी चर्चा करीत होते. वयोवृद्ध शेतकरी गावातील पारावर बसून उत्पादनाबाबत चर्चा करीत होते. खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगांनी आक्र मण केले की, शेतकरी आपसात चर्चा करून त्यावर उपाययोजना करीत होते. मात्र कालांतराने ही पद्धतच मोडीत निघाली.आता कोणत्याही गावात हे चित्र दिसून येत नाही. पीक चांगले राहण्याकरिता आता शेतकरी रासायनिक खतांचा भरमसाट वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्वे नष्ट होत आहेत. सध्या पिकांना रासायनिक खतांचा डोज न दिल्यास उत्पन्नात घट येत असल्याचेही दिसून येते.परिणामी शेतकरीही त्यांचा अती वापर करतात. अधिक उत्पन्नासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. सिंचन सुविधा तोकडी असल्याने त्यांना कोरडवाहू जमिनीतूनच जादा उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.पूर्वी शेतकरी कोरडवाहू शेतात वांगोडे तयार करून त्यात भाजीपाला लागवड करायचे. त्यावर त्यांचा घरगुती खर्च भागत असे. मात्र सध्या कोरडवाहू शेतातून हे वांगोडे नष्ट झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतात भाजीपाला लावणेच बंद केले आहे.कीटकनाशक फवारणीमुळे होणारे नुकसानआता शेतकरी रासायनिक खतांचा वापर जादा प्रमाणात करतात. त्यामुळे सुपीक शेतजमीन आता बंजर होण्याची शक्यता बळावली आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबतच दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचाही अत्यधिक वापर होऊ लागला आहे. या किटकनाशकांमुळे शेतातील ज्या वनस्पती पिकांसाठी उपयोगी ठरतात, त्या वनस्पती व पोषक तत्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. किटकनाशकांच्या फवारणीमुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे. वारंवार आणि अधिक रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीलाही आता रासायनिक खतांची सवय झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती