शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

आतापर्यंत जिल्ह्यातील १४ पोलिसांचा देशपातळीवर सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 11:47 PM

जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल म्हणून प्रसिध्द आहे.येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी नक्षलवाद्यांशी लढा देतांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून देशपातळीवर झालेल्या सन्मानाचे १४ पोलीस अधिकारी, कर्मचारी आत्तापर्यंत मानकरी ठरली आहेत.

ठळक मुद्देप्रवेशद्वारावर माहिती फलक : ९ जणांना पंतप्रधान जीवनरक्षा तर ५ जणांना राष्ट्रपती पदक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल म्हणून प्रसिध्द आहे.येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी नक्षलवाद्यांशी लढा देतांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणून देशपातळीवर झालेल्या सन्मानाचे १४ पोलीस अधिकारी, कर्मचारी आत्तापर्यंत मानकरी ठरली आहेत.जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना देशपातळीवर कोणता मानसन्मान मिळाला यावर गोंदिया जिल्ह्यावर नजर टाकली असता गोंदियाच्या वर्तमान पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांना १४ अधिकारी कर्मचारी असल्याचे कळले.जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकारी, कर्मचारी देशपातळीवर पंतप्रधान जिवनरक्षा व राष्ट्रपती पदकाने सन्मानित झाले आहेत. मात्र याची माहिती सर्वसामान्य व पोलीस जवानांना नव्हतीच. पोलीस विभागातील कर्मचारी, अधिकारी यांनी पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनीही यश संपादन करावे, यासाठी या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे असलेले दोन फलक पोलीस अधीक्षकांनी तयार करुन ते फलक पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ लावले आहेत. सन २०११ मध्ये परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक संग्रामसिंग निशानदार व पोलीस नायक कमलकिशोर तुरकर यांनी २००५ मधील पूरपिडीतांना वाचविले. २००५ मध्ये पूर आल्यामुळे मध्यप्रदेशच्या संजय सरोवराचे २० दारे उघडण्यात आली. त्यामुळे वाघनदीतून जाणारे पाणी अडले परिणामी ते गावात शिरू लागले. बडगाव येथे पूरपरिस्थीती निर्माण झाल्यावर तेथील लोकांना डोंग्याच्या माध्यामातून १०० फूट अंतरावर आणत असताना ६० फूट अंतरापूर्वीच डोंगा उलटला. त्या वेळी संग्रामसिंग निशानदार व कमलकिशोर तुरकर यांनी डोंग्यातील आठ लोकांना वाचविले. त्यात दोन चिमुकल्यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांना २०११ ला पंतप्रधान जिवनरक्षा पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.सन २०१५ मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया जंगलात आठ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणारे तत्कालीन चिचगडचे ठाणेदार राजेंद्रकुमार परमानंद तिवारी, उपनिरीक्षक संदीप मस्के, अविनाश गडाख, रमेश येळे, राधेश्याम गाते, वामन पारधी, उमेश इंगळे यांना अश्या ९ जणांना पंतप्रधान जिवनरक्षा पदक देण्यात आले होते. तर आपल्या सेवेत उल्लेखनिय कामगिरी करणारे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना २०१० मध्ये, पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांना २०१५ मध्ये, सहाय्यक फौजदार शेख कादर शेख जब्बार शेख यांना २०११ मध्ये, पोलीस हवालदार पोमेंद्र पटले यांना २००६ मध्ये तर उमराव शरणागत यांना २०११ मध्ये राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले.जिल्ह्यात काम करताना ज्यांचा देशापातळीवर सन्मान करण्यात आला. अश्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या नावाचे फलक लावण्यात आले.-हरिष बैजल, जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया.

टॅग्स :Policeपोलिस