शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत १३२८ जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

दुबई आणि दिल्लीहून परतलेल्या नागरिकांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. १२ जून रोजी तिरोडा तालुक्यातील दुबईहून परतलेल्या एका जणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण कोरोना बाधित आढळले. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाली.

ठळक मुद्दे८२ स्वॅब नमुन्यांच्या अहवाल अप्राप्त : गुरूवारचा दिवस ठरला दिलासादायक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५१२ जणांचे स्वॅब नमुने घेवून त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यापैकी १०२ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले तर १३२८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. ८२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. मात्र गुरूवारी (दि.१८)जिल्ह्यात नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे.दुबई आणि दिल्लीहून परतलेल्या नागरिकांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. १२ जून रोजी तिरोडा तालुक्यातील दुबईहून परतलेल्या एका जणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण कोरोना बाधित आढळले. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ झाली. त्यामुळे केवळ सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर पोहचला. सुदैवाने दुबई आणि दिल्लीहून परतलेल्या नागरिकांचा त्यांच्या गावाशी संपर्क न आल्याने आणि त्यांना क्वारंटाईन करुन ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत झाली.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १०२ वर पोहचला असून यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. तर ३३ कोरोना बाधितांवर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गोंदिया येथे स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरू झाल्याने स्वॅब नमुन्यांच्या चाचणीचे प्रमाण देखील वाढविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने घेतलेल्या ८२ नमुन्यांचा अहवाल गोंदिया प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. गुरूवारी जिल्ह्यात नवीन कोरोना बाधिताची नोंद न झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या