शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

सागवान तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला

By admin | Updated: November 29, 2014 01:40 IST

धाबेटेकडी सहवनक्षेत्रातील तिडका बिट क्र.४ च्या कक्ष क्र. २७४ मधून सागवान झाड कापण्यात आले.

अर्जुनी/मोरगाव : धाबेटेकडी सहवनक्षेत्रातील तिडका बिट क्र.४ च्या कक्ष क्र. २७४ मधून सागवान झाड कापण्यात आले. मोटारसायकलने वाहतूक करुन घरी चिराण करत असताना दोन आरोपींना वनकर्मचाऱ्यांनी पकडले. ही घटना मंगळवारी (दि.२५) रात्री २ वाजता उघडकीस आली. आरोपी सध्या भंडारा कारागृहात आहेत.प्राप्त माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी आरोपी पितांबर केवळराम लंजे व घनश्याम लहू तुमडाम रा. बोळदे/करडगाव हे शासकीय वनकक्ष क्र.२७४ मध्ये गेले. सागवान झाड कापून त्या लाकडांची मोटारसायकलने वाहतूक केली. व रंधा मशीनच्या सहाय्याने चिराण करीत असल्याचे आढळून आले. वनकर्मचाऱ्यांनी लाकडाच्या कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा आरोपींनी वनाधिकाऱ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली व लगेच त्यांचेवर हल्ला केला. शिताफिने बचाव करत वनकर्मचाऱ्यांनी आरोपींना पकडले व त्यांना अटक केली. घटनास्थळावरुन ५ हजार रुपये मुल्याचे २३ नग सागवन चिराण, ५० हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स मोटारसायकल क्र.एमएच ३१ सी.सी. ७६८४ तसेच ५० हजार रुपये किमतीची रंधा मशीन असे एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २, २६ (१) ई, मुंबई वननियमावली १९४२ चे नियम क्र.६६, ८२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी एस.पी. कंवर यांच्या मार्गदर्शनात वनाधिकारी संतोष थिपे, वनरक्षक ब्राम्हणकर, नागपुरे, राऊत, खोब्रागडे, शहारे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)