शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वंचितांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनतेरस. धनतेरसच्या दिवशी सौंदड येथील सामाजिक कार्यकर्ता प्राध्यापक अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे, आरती चवारे, विश्वजीत बागडे, हिमेश्वरी कावडे यासर्वांनी मिळून मुलांना गोडधोड आणि मिठाई भेट म्हणून दिली.

ठळक मुद्देमांगगारूडींच्या वस्तीत पक्वानांची मेजवानी : सामाजिक कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळी सण म्हणजे इथल्या सणांमधला राजा. दिव्यांची आरास शहर व गावापासून गल्लीपर्यंत आणि झोपडपट्टीतही मांडली जाते. पण प्रत्येकाच्याच वाट्याला हा आनंदाचा सोहळा प्रकाशाचे पर्व येईल असं नाही. गोंदियापासून अगदी हाकेच्या अंतरावर मांगगारूडी समाजाची वस्ती जी अण्णाभाऊ साठे नगर या नावाने ओळखली जाते. या वस्तीतील लोकांच्या सर्वांगीण उत्थानासाठीसाठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जीव पणाला लावला आहे. ज्या वस्तीसाठी ते रात्रंदिवस झटत असतात ते मुख्य प्रवाहात यावेत म्हणून धडपडत असतात. ती वस्ती या आनंदापासून सुखापासून वंचित राहिल म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत या वस्तीला भोजनदान दिले जाते.दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनतेरस. धनतेरसच्या दिवशी सौंदड येथील सामाजिक कार्यकर्ता प्राध्यापक अनिल मेश्राम, अमरचंद ठवरे, आरती चवारे, विश्वजीत बागडे, हिमेश्वरी कावडे यासर्वांनी मिळून मुलांना गोडधोड आणि मिठाई भेट म्हणून दिली. दिवाळीचा दुसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा असून बहेकार व्यसनमुक्ती केंद्राचे विजय बहेकार, विजय ठवरे, वरून खंगार, वशिष्ठ खोब्रागडे जागृत सेलोकर व सविता बेदरकर यांनी मिळून भोजनाचा कार्यक्र म ठेवून पोटभर गोडधोड खाऊ घातले.दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे बळी महोत्सव. या दिवशी शेतकऱ्यांचे राजपाट हिरावले गेले. बळीराजाच्या स्मृतीदिनानिमित्त गोधनाला अभिवादन करून भोजनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला.यावेळी वस्तीतील विजय पात्रे, सविता विनोद अग्रवाल आणि सविता बेदरकर उपस्थित होत्या. चौथा दिवस म्हणजे भाऊबिजेचा व यादिवशी फराळाचं घेऊन दिव्या भगत यांच्या हस्ते वस्तीतील लोकांना भाऊबीजनिमित्त भेट देण्यात आली. दिवाळीच्या सांगतेसाठी पाचव्या दिवशी प्राध्यापक वैशाली कोहपरे, रेणू डोंगरे, वैशाली खोबरागडे, आरती चवारे, नानन बिसेन, यशोधरा सोनवणे, मनिषा पशीने यांनी आपापल्या घरून भोजन आणून या वस्तीतील आबालवृद्ध आणि लहान बालकांना भोजनदान दिले.दिवाळी सण म्हणजे आनंदाचा उत्साहाचा पण या आनंदापासून या वस्तीतील लोक वंचित राहू नये त्यांनाही सुग्रास भोजनाचा आणि मिठाईचा आस्वाद घेता यावा म्हणून दिवाळीचे पाचही दिवस भोजनदान देऊन प्रकाशाच्या पर्वाचे पूजन केले गेले. दिवाळीचे पाच दिवस का होईना वंचिताच्या चेहºयावर हास्य फुलविण्याचे काम सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.फटाके देण्याचे टाळलेविविध पक्वानांची मेजवानी देत असतानाच मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके देण्याचे कटाक्षाने टाळले. कारण फटाक्यांमुळे लहान पशु आणि पक्ष्यांवर व त्यांच्या आरोग्यावर परिणाम होते. शिवाय वायू प्रदूषण होत असून ज्या गोष्टी पर्यावरणाला हानीकारक आहेत त्यांचा उपयोग टाळण्यासाठी फटाके देण्याचे टाळण्यात आले. या उपक्रमातून स्वत:बरोबर इतरांसाठी कसे जगता येईल याचा धडा या विचाराला जोडलेल्या लोकांनी समाजासमोर ठेवला.

टॅग्स :social workerसमाजसेवक