शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आता छोट्या वाहनांना स्कूल बस परवाना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:46 IST

अलीकडे स्कूल बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर परवाना नसलेल्या खासगी वाहनातून असुरक्षीतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. तर परवानाधारक वाहन चालक सुध्दा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहे.

ठळक मुद्देआरटीओ कार्यालयांना तोंडी सूचना : वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : अलीकडे स्कूल बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर परवाना नसलेल्या खासगी वाहनातून असुरक्षीतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. तर परवानाधारक वाहन चालक सुध्दा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान वाढत्या अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सहा अधिक एक अशी आसन क्षमता असलेल्या वाहनांना स्कूल बस म्हणून परवाना देणे बंद करण्याचा निर्णय घेतला.शहर आणि ग्रामीण भागात दोन हजारावर शासकीय व खासगी शाळा आहेत. घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी काही शाळांनी स्वत:च्या स्कूल बसेसची व्यवस्था केली आहे. तर काही पालक परवानाधारक स्कूल व्हॅन इतर वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवितात. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षीत वाहतूक करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक नियमवाली तयार केली आहे. त्या सुविधा असलेल्या परवानाधारक वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करता येते. मात्र काही परवानाधारक स्कूल बस व इतर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून वाहतूक केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षीतेचा प्रश्न निर्माण होतो. मात्र या प्रकाराकडे संबंधित विभागाचे सुध्दा दुर्लक्ष होते. शहर आणि ग्रामीण क्षेत्रात अवैधरित्या वाहतुकीमुळे विद्यार्थी वाहून नेणाऱ्या वाहनांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने ६ अधिक १ अशी आसन क्षमता असलेल्या वाहनांना परवाना देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सुध्दा सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आल्याची माहिती आहे.काय आहे नियम?नियमानुसार शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी त्या वाहन चालकाकडे मोटार वाहन अधिनियमानुसार वाहतुकीचा परवाना पाहिजे. प्रथमोपचार संच, अग्शिमन यंत्रणा, दप्तर व डब्बे ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रशिक्षित चालक आदी नियम आहेत. मात्र या नियमांकडे ना पालक लक्ष देतात ना शाळा व्यवस्थापन त्यांची दखल घेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षीत वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो.छोट्या वाहनांना यापुढे परवाना देवू नका अशा तोंडी सूचना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहे. त्या दिशेने ६ अधिक १ अशी वाहनक्षमता असणाऱ्या वाहनांना स्कुलचा बस परवाना देणे बंद करण्यात आले आहे.-विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया.

टॅग्स :SchoolशाळाRto officeआरटीओ ऑफीस