शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

बळीराजासाठी हमीभावात तुटपुंजी वाढ, पण लागवड खर्चात मोठी भाववाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 22:01 IST

पूर्व विदर्भात धानाचे पीक घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. इंधनाशिवाय शेती होत नाही अशी सद्याची परिस्थिती आहे

ठळक मुद्देलागवड खर्चाच्या तुलनेत हमीभाव वाढत नसल्याने शेतकरी दुबळा होत चालला आहे. धानाचे आधारभूत हमीभाव केवळ ७२ रुपये प्रति क्विंटल वाढले आहेत.

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : केंद्र सरकारने २०२१-२२ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात ७२ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या सर्वसाधारण धानाला येत्या खरीप हंगामात १९४० रुपये प्रति क्विंटल दर मिळणार आहे. धानाच्या लागवड खर्चात प्रचंड वाढ झाली असताना त्या तुलनेत केलेली वाढ ही अत्यंत तुटपुंजी आहे. हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका केली जात आहे.

पूर्व विदर्भात धानाचे पीक घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. इंधनाशिवाय शेती होत नाही अशी सद्याची परिस्थिती आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. मजुरी, रासायनिक खत, औषधांच्या किमती वाढल्या आहेत. नैसर्गिक संकट तर पाचवीलाच पुजले आहे. या सर्वांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अंगमेहनतीशिवाय शेती व्यवसाय चालतच नाही. साधारणतः १२० दिवसांचा हंगाम असतो. शेतात अख्खे कुटुंब राबते, यात अतिशयोक्ती नाही. सर्वांच्या मजुरीचा विचार केला तर शेती व्यवसाय हा परवडणारा नाही. मागील वर्षांचा विचार करता शेतीचा लागवड खर्च हा तब्बल २५ टक्क्यांनी वाढला आहे. २०१९-२० या वर्षात जिथे २६५५० रुपये खर्च होता. तो २०२०-२१ मध्ये ३१५३० रुपये झाला आहे. वास्तविकतेत ग्रामीण भागात शेती हा सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे; मात्र या व्यवसायाकडेच शासनाचे दुर्लक्ष आहे.

लागवड खर्चाच्या तुलनेत हमीभाव वाढत नसल्याने शेतकरी दुबळा होत चालला आहे. धानाचे आधारभूत हमीभाव केवळ ७२ रुपये प्रति क्विंटल वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या पाच वर्षांत लागवड खर्च पाचपटीने वाढला आहे. केंद्र शासनाने केलेली ही वाढ अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाने तीन हजार रुपये प्रतिक्विंटल धानाला आधारभूत किंमत दिली तरच शेतकऱ्यांचे भले होईल.गंगाधर परशुरामकर             माजी जि. प. सदस्य गोंदिया 

टॅग्स :Farmerशेतकरीministerमंत्रीFarmers Protestशेतकरी आंदोलनgondiya-acगोंदिया