शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

साहेब माणुसकीच्या नात्याने तरी आमची दखल घ्या; बँकाकडून होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 20:56 IST

वृध्द पती-पत्नी पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर त्यांच्या वयाचा आणि आजाराचा विचार करता त्यांचे काम प्राधान्याने बँक कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्दे पैसे काढण्यासाठी वृध्दांची फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनेक ग्राहकांनी जवळची बँक आपले खाते गावाजवळील बँकेत उघडले आहे. यात काही वृध्दांचा देखील समावेश आहे. बँकेच्या नियमानुसार पती-पत्नीचे एकत्रित खाते असल्यास ते विड्राल करण्यासाठी दोघे उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे वृध्द पती-पत्नी पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर त्यांच्या वयाचा आणि आजाराचा विचार करता त्यांचे काम प्राधान्याने बँक कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करित त्यांना तासन तास बँकेबाहेर ताटकळत बसवून ठेवले जात असल्याचा प्रकार गुरूवारी (दि.२५) पांढरीबोडी येथील बँकेत उघडकीस आला. त्यामुळे या वृध्द दाम्पत्यांवर साहेब माणुसकीच्या नात्याने तरी आमची दखल घ्या अशी विनंती करण्याची वेळ आली आहे.

गोंदिया तालुक्यातील पांढराबोडी येथे बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत सध्या पीक कर्जाची उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी आहे. गुरूवारी दोन वृध्द दाम्पत्य आपल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी येथील बँकेत आले होते. यापैकी एक वृध्द दिव्यांग असून त्याची वृध्द पत्नी त्यांना घेवून बँकेत आली होती. तर दुसरे वृध्द दुलीचंद सेवईवार हे आजारी असल्याने ते सुध्दा पत्नीसह बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. मात्र येथील बँक कर्मचाऱ्यांनी या दोन्ही वृध्दांची दखल घेवून त्यांना त्वरीत विड्राल देऊन अथवा त्यांचे काम प्राधान्याने करुन देणे अपेक्षित होते. मात्र तालुक्यातील बलमाटोला येथून बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या वृध्द आणि आजारी ग्राहकांची बँक कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना बँकेच्या पायऱ्यांवर दोन ते तीन तास ताटकळत राहावे लागले. बँक कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ ही ३.३० वाजताची आहे. मात्र ४ वाजल्यानंतर बँकेचे गेट उघडून ग्राहकांना आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे बलमाटोला येथून आलेल्या दोन्ही वृध्दांना बँकेच्या पायऱ्यांवर बसून आपल्या नंबर येण्याची प्रतीक्षा करावी लागली. यापैकी एका वृध्दाची प्रकृती तर फार गंभीर होती. त्याच्या पत्नीने ही बाब बँक कर्मचाऱ्यांना सांगितली तरी त्यांनी याची दखल घेतली नाही. बँकेबाहेर असलेल्या ग्राहकांनीसुध्दा या वृध्दाची दखल घेत त्यांची आस्थेने विचारपूस केली. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांना या वृध्दांची दखल घेणे आवश्यक वाटले आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी किमान माणुसकीच्या नात्याने तरी या वृध्दांची दखल घेवून त्यांचे काम प्राधान्याने करुन देणे अपेक्षित होते. मात्र तसे न केल्याने ग्राहकांनी सुध्दा याबाबत संताप व्यक्त केला.पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची फरफट कायममुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वच बँकांना पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरु नये अशा सूचना केल्या आहेत. मात्र यानंतर यानंतरही राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हाच प्रकार पांढराबोडी येथील बँकेत सुरु आहे. मागील पाच दिवसांपासून शेतकरी पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकेत जात आहेत. मात्र त्यांना विविध कारणे सांगून दररोज परत पाठविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :bankबँक