शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
4
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
5
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
6
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
7
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
8
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
10
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
11
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
12
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
13
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
14
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
15
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
16
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
17
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
18
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
19
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
20
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

साहेब, जरा इकडेही लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:43 IST

ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पण काही शिक्षकांचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा यामुळे शैक्षणिक दर्जा कमकुवत होत चालला आहे.

ठळक मुद्देशिक्षक मस्त, अधिकारी सुस्त : तालुक्याचा शिक्षण विभाग रामभरोसे

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. पण काही शिक्षकांचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा यामुळे शैक्षणिक दर्जा कमकुवत होत चालला आहे. याकडे गटशिक्षणाधिकारी सर्याम यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या ११३ आहे. तर तालुक्यात कोकणा (जमि), चिखली, डोंगरगाव (डेपो), शेंडा, पांढरी, डव्वा, कोसमतोंडी, सौंदड या नऊ केंद्रांचा समावेश आहे. यात विद्यार्थी संख्या ७ हजार ५०३ आहे. मुलांच्या विद्यार्जनासाठी ३९२ शिक्षकांची नियुक्ती केली आहे.विद्यार्थ्यांना विद्यार्जनाचे धडे उत्तमप्रकारे दिले जावे यासाठी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. गटशिक्षणाधिकारी म्हणून सर्याम कार्यरत आहेत. सदर अधिकारी सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये रूजू झाले त्यावेळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणताही शिक्षक तालुक्यात इतरत्र फिरताना दिसत नव्हता. पण सध्या अधिकाºयांच्या दुर्लक्षीतपणामुळे तालुक्याच्या शैक्षणिक दर्जा खालावत चालल्याचा पालकांचा आरोप आहे. तालुक्यातील १८ ते १५ किमी अंतरावरील शाळेत जावून बघितल्यास आढळते.राजाच तसा तर प्रजा कशी राहणार? असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही अधिकारी दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील काही शाळांतील शिक्षक लाखनी, भंडारा, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, गोंदिया, साकोली, देवरी या ठिकाणावरुन अप-डाऊन करतात. याचे प्रत्यक्ष उदाहरण सायंकाळी ४ वाजेपासून कोहमारा बसस्थानकावर पहावयास मिळते. पण कुणीही अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. स्वत:च्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अशी अवस्था झाली आहे.तालुक्यातील जवळजवळ सर्वच शाळा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास तसेच मद्यपान व धुम्रपान करण्यास मनाई आहे. तसे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सूचना फलक लावण्यात आले आहे. पण बहुतेक शाळेचे शिक्षकच खर्रा घेवून शाळेत येत असल्याचे पाल्य आपल्या पालकांना सांगतात. त्यामुळे या नियमाचा देखील शाळा परिसरात फज्जा उडत आहे.शाळेत जाण्यापूर्वी रोज दोन खर्रे (पार्सल) शाळेत नेले जातात. पानठेलेवाले १० वाजताच खर्रा तयार ठेवतात. शिक्षकच खर्रा शाळेत खात असतील तर त्याचा वाईट परिणाम मुलांवर होईल. नुसते सूचना फलक लावून होणार नाही. त्याचे पालन खºया अर्थाने होते काय, याकडे अधिकाºयांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.