शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, धान खरेदीस लवकर परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 05:00 IST

परिसरात आणि संस्थेंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी धान कापणी, मळणी आणि चुरणी सुरु केली आहे. मात्र हे धान विक्री करण्यासाठी शासनाच्या सहकारी संस्था व महामंडळाने अद्याप धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील वर्षी सातबारावर संस्थांनी धान खरेदी केली. तर अतिरिक्त धान खरेदी म्हणजे व्यापाऱ्यांचेही धान शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर विकले असे दिसून आले आहे.

ठळक मुद्देशासनासह महामंडळाने निर्णय घ्यावा : शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

n  लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी :    येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आहे, मात्र  अजुनही या संस्थेत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात अडकले आह. अशात तात्काळ धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी शासन व महामंडळाने परवानगी दयावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.परिसरात आणि संस्थेंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी धान कापणी, मळणी आणि चुरणी सुरु केली आहे. मात्र हे धान विक्री करण्यासाठी शासनाच्या सहकारी संस्था व महामंडळाने अद्याप धान खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. मागील वर्षी सातबारावर संस्थांनी धान खरेदी केली. तर अतिरिक्त धान खरेदी म्हणजे व्यापाऱ्यांचेही धान शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावर विकले असे दिसून आले आहे. याच अटीवर महामंडळ व शासन लक्ष देऊन असून याच्या चौकशीचे आदेश काढून तपासणी सुरु असल्यामुळेही धान खरेदीची परवानगी देत नाही. या प्रकरणावर मार्ग काढण्यासाठी आदिवासी संस्थांचे अध्यक्ष व सचिवांची सभा झाली व आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि आमदार सहेषराम कोरोटे यांच्याकडे साकडे घातले होते, पण यावर काहीच निर्णय शासनाकडून झालेला दिसत नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाचे राज्याचे संचालक भरत दुधनाग यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही. परंतू संस्थांच्या या प्रकारामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने यावर उपाय शोधून शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी मार्ग मोकळा करुन द्यावा अशी मागणी बाराभाटी, येरंडी,  डोंगरगाव, कवठा, बोळदे, कुंभीटोला, ब्राह्मणटोला,  सुकळी खैरी दाभना चापटी अशा १३ गावांतील शेतकऱ्यांची मागणी आहे.

विना सातबाराशिवाय संस्था धान खरेदी करत  नाही. धान खरेदी सुरु करण्यासाठी आदेश दयावे. - तुलाराम शाहू मारगाये अध्यक्ष,  आदिवासी विविध सहकारी संस्था, बाराभाटी

आमची बैठक झाली शासन विचार मंथन करीत आहे, शेतकऱ्यांच नुकसान होऊ देणार नाही. धान खरेदी केंद्र सुरु होतील. - मनोहर चंद्रिकापुरे , आमदार, अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र

आमच्या चर्चा सुरु सून सहकार मंत्री यांच्यासोबतही बैठक आहे, लवकरच तोडगा काढणार आहोत.- सहषराम कोरोटे, आमदार

टॅग्स :Farmerशेतकरी