शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

सिया ठाकूर जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:18 IST

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला.यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्यातील ८७.९९ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

ठळक मुद्देविभागात जिल्हा पहिल्या स्थानी : ५० विद्यालयांचा निकाल शंभर टक्के, विज्ञान शाखेचा टक्का वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला.यात नागपूर विभागात गोंदिया जिल्हा प्रथम आला असून जिल्ह्यातील ८७.९९ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. गोंदिया येथील शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिया धनेंद्र ठाकूर हिने सर्वाधिक ९५.८४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. तर याच विद्यालयाचा विद्यार्थी श्रीपाद विजय देशपांडे हा ९५.४० टक्के गुण घेऊन उर्तीण झाला. तर अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल जितेंद्र साखरे ९५.३८ टक्के गुण प्राप्त केले.बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धावपळ सुरू होती. बारावीनंतर खऱ्या अर्थाने करिअरला सुरूवात होत असल्याने जास्तीत जास्त गुण घेवून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते.त्यामुळेच आपला पाल्य चांगले गुण उर्तीण व्हावा, अशी सर्व पालकांची इच्छा असते यासाठीच ते सुध्दा वर्षभर मेहनत घेत असतात.यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १९ हजार ८२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १७ हजार ४४७ विद्यार्थी उर्तीण झाले.मागील वर्षीच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात अव्वल स्थान प्राप्त केले असून जिल्ह्याचा निकाल ८७.९९ टक्के लागला आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक ९ हजार ६६६ विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. यापैकी ९ हजार २२४ विद्यार्थी (९४.४५) उर्तीण झाले.तर कला शाखेचे एकूण ८ हजार ७३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७ हजार ३८ विद्यार्थी (८०.५९) उर्तीण झाले.वाणिज्य शाखेचे एकूण ९३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८४६ विद्यार्थी (९०.५८) उर्तीण झाले.तर व्होकेशनल शाखेच्या एकूण ३९५ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. यापैकी ३३९ विद्यार्थी (८५.८२) उर्तीण झाले.विशेष म्हणजे मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या बारावीच्या निकालाची टक्केवारी सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.आमगाव तालुका निकालात सरसमागील तीन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्याच्या निकालाच्या टक्केवारीत सातत्याने सुधारणा होत आहे. यंदा गोंदिया येथील शांताबेन मनोहरभाई पटेल विद्यालयाची विद्यार्थिनी सिया ठाकूर हिने ९५.८४ टक्के गुण घेवून जिल्ह्यात अव्वल ठरली. तर तालुका निहाय निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात आमगाव तालुका सरस ठरला आहे. आमगाव तालुक्याचा निकाल ९१.२२, अर्जुनी मोरगाव ९०.३६, गोंदिया ८९.३४, सडक अर्जुनी ८७.२४, सालेकसा ९०.२९, देवरी ८४.९३, तिरोडा ८२.४३ टक्के निकाल लागला. मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत सुधारणा झाली असून गोंदिया जिल्हा नागपूर विभागात अव्वल ठरला आहे.विज्ञान व वाणिज्य शाखेकडे वाढला कलजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वाढत आहे. दरवर्षी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून निकालाची टक्केवारी सुध्दा सुधारत आहे. यंदा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९४.४५टक्के, कला शाखेचा ८०.५९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९०.५८ टक्के आणि व्होकेशनल शाखेचा ८५.८२ टक्के निकाल लागला.यावरुन विज्ञान शाखेची टक्केवारी वाढत आहे. गत वर्षाच्या तुलनेत विज्ञान आणि व्होकेशनल शाखेच्या निकालात तीन ते चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विज्ञान, वाणिज्य शाखेसह व्होकेशनल शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.सीबीएसई अभ्यासक्रमाकडे वाढतोय कलमहाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाऐवजी सीबीएसई अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल अधिक असून निकालाची टक्केवारी सुध्दा अधिक आहे. त्यामुळेच सीबीएसई निकालात शंभर टक्के निकाल देणाºया शाळा मात्र महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालात माघारल्याचे चित्र आहे.५० विद्यालयांनी मारली सेंचूरीदरवर्षी जिल्ह्याच्या निकालात सुधारणात होत असल्याचे दिलासादायक चित्र असताना विद्यालयांच्या निकालात सुध्दा सुधारणा होत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. बारावीच्या निकालात जिल्ह्यातील ५० कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात सर्वाधिक विद्यालय गोंदिया तालुक्यातील असून त्या पाठोपाठ सडक अर्जुनी तालुक्यातील विद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत सुधारणा झाली असून ५० विद्यालयांनी शंभर टक्के टक्केवारी गाठली आहे.यंदाही सावित्रीच्या लेकीच पुढेमंगळवारी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची उर्तीण होण्याची टक्केवारी अधिक आहे.त्यामुळे यंदाही जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत सावित्रीच्या लेकीच पुढे असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण ९ हजार ९१६ विद्यार्थिनीनी परीक्षा दिली. त्यापैकी ८८९३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून त्याची टक्केवारी ८९.६८ टक्के आहे. तर एकूण ९ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८५५४ विद्यार्थी उर्तीण झाले. उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८६.३० टक्के आहे. त्यामुळे निकालाच्या टक्केवारीत मुलींनी आघाडी घेतली.तीन वर्षांनी गोंदिया तालुक्याने उघडले खातेमागील तीन वर्षांच्या बारावीच्या निकालाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास अर्जुनी मोरगाव तालुका निकालात सरस ठरला होता. शिवाय याच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले होते. मात्र या तालुक्याचा हा विक्रम यंदा गोंदिया तालुक्याने मोडीत काढला असून गोंदिया येथील शांतबेन मनोहरभाई पटेल विद्यालयाची विद्यार्थी सिया ठाकूर हिने विज्ञान शाखेतून ९५.८४ टक्के गुण घेवून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले. तर याच शाळेचा विद्यार्थी श्रीपाद देशपांडे यांने ९५.४० टक्के गुण घेवून उर्तीण झाला. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाची सोनल साखरे हिने ९५.३८ टक्के गुण घेवून यश संपादन केले.व्होकेशनल शाखेच्या निकालात सुधारणाविज्ञान आणि वाणिज्य शाखेसह व्होकेशनल शाखेकडे सुध्दा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे या शाखेच्या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा व्होकेशनल शाखेचा निकाल ८५.८२ टक्के लागला असून कला शाखेच्या तुलनेत ५ टक्के निकाल अधिक लागला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाकडे सुध्दा विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीHSC Exam Resultबारावी निकाल