शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाची ताकद भाजपाला दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:44 IST

केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारने मागील चार वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेच मोठे विकास कामे केले नाही. उलट अनेक योजनांची नावे बदलविण्या पलिकडे त्यांना काहीच करता आले नाही. ऐवढेच नव्हे तर अनेक धोरणे व कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न या सरकारने केला.

ठळक मुद्देवर्षाबेन पटेल : अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारने मागील चार वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेच मोठे विकास कामे केले नाही. उलट अनेक योजनांची नावे बदलविण्या पलिकडे त्यांना काहीच करता आले नाही. ऐवढेच नव्हे तर अनेक धोरणे व कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न या सरकारने केला. हे सरकार जातीय वादाला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे. त्यामुळे अशा सरकारला आता संविधानाची ताकद दाखवा, असे आवाहन वर्षा पटेल यांनी केले.भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपा, पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथे आयोजित प्रचार सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी मंजुषा चंद्रिकापुरे, युवक राकाँचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य किशोर तरोणे, माहुरकुडा जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, प्रमोद लांजेवार, सुशीला हलमारे, काँग्रेसचे समन्वयक रत्नदीप दहिवले, करूणा नांदगावे, अनिता खोब्रागडे, पद्मा राठोड, लोकपाल गहाणे, श्रावण मेंढे, मनोहर शहारे, राकेश लंजे, राकेश जायस्वाल, सुरेश खोब्रागडे, नामदेव डोंगरवार, संग्रामे ेउपस्थित होते.वर्षा पटेल म्हणाल्या, भंडारा गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगिन विकास केवळ प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनातच शक्य आहे. जाती धर्माच्या नावावर राजकारण नको. गोरगरीबांवर अन्याय नको, हिच धोरणे आघाडी सरकारची होती. आता भाजप सरकार चुकीचे धोरणे लागू करुन सर्वांचे कंबरडे मोडत आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. एकीकडे उज्वला योजनेतंर्गत गॅस सिलिंडर उपलब्ध करुन देऊन दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करुन सरकारने नेमके काय साध्य केले हे समजण्या पलिकडे आहे. या सरकारच्या काळात सर्वच जण दुखी असल्याचे सांगितले. त्यामुळे जनतेला मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला त्यांची जागा दाखविण्याची संधी मतदारांना मिळाली असल्याचे सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस