शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गटसचिवांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:43 IST

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या गटसचिवांनी ग्रीन यादीत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची लाभ मिळणार असल्याचे सांगून कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले.

ठळक मुद्देउपनिबंधकांनी घेतली दखल : तिरोडा पीक कर्ज वाटपप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या गटसचिवांनी ग्रीन यादीत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची लाभ मिळणार असल्याचे सांगून कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले. शेतकऱ्यांनी कर्ज भरल्यानंतर त्यांना आता कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर जिल्हा बँक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने याची गांर्भियाने दखल घेत गटसचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील १ लाखावर शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. यापैकी पडताळणीनंतर ८३ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. आतापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून एकूण ६३ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने उर्वरित शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची बँकामध्ये दररोज पायपीट सुरू आहे. शासनाने ग्रीन यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ओटीएस योजनेचा लाभ देण्याचे निर्देश बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांना दिले आहे. मात्र यानंतरही तिरोडा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या गटसचिवांनी ग्रीन यादीत समावेश नसल्याने शेतकऱ्यांना परस्पर नोटीस देवून थकीत कर्ज भरण्यास सांगितले. तसेच या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेतंर्गत लाभ व नवीन पीक कर्ज देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उधार उसणवारी व दागदागीने विकून नवीन कर्ज मिळेल, या आशेने कर्जाची परतफेड केली. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटून आणि खरीप हंगामाला सुरुवात होवून नवीन पीक कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांनी गटसचिव व बँकाकडे जावून चौकशी केली. तेव्हा जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी तुमचे कर्जमाफीच्या ग्रीन यादीत नाव नाही, त्यामुळे तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देवून नवीन पीक कर्ज देता येत नसल्याचे सांगितले. हे ऐकूण कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना धक्का बसला. खरीप हंगामाला सुरूवात झाली असून पीक कर्ज मिळाले नाही तर हंगाम करणार कसा, नातेवाईकांकडून उसणवार आलेले पैसे परत करायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. त्यांनी ही सर्व हकीकत लोकमत प्रतिनिधीला सांगितली. त्यानंतर लोकमतने यासंबंधीचे वृत्त गुरूवारच्या (दि.१२) अंकात प्रसिध्द केले. त्यानंतर जिल्हा बँका व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात खळबळ उडाली. त्यांनी लगेच या प्रकरणाची चौकशी सुरु केली. तसेच ग्रीन यादीत समावेश नसताना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असे सांगून शेतकºयांना कर्जाची रक्कम भरणाऱ्या गटसचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.समावेश नसताना नोटीस कशीज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या ग्रीन यादीत समावेश नाही. त्या शेतकºयांना गटसचिवांनी कर्जाची रक्कम भरण्यासाठी नोटीस कशी बजावली. तसेच ही नोटीस बजाविताना जिल्हा बँक आणि उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना का विश्वासात घेतले नाही. परस्पर नोटीस कशीे बजावलीे यादी बाबीचा जाब उपनिबंधक कार्यालयाने कारणे दाखवा नोटीसव्दारे विचारला आहे.शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाबाबत अनिश्चिततातिरोडा तालुक्यातील जवळपास दीडशे शेतकºयांनी ओटीएस योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ मिळेल म्हणून कर्जाची परतफेड केली. मात्र आता या शेतकऱ्यांची नावे ग्रीन यादीत नसल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे दूरच राहिले नवीन पीक कर्ज सुध्दा मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे.तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाली असून याची चौकशी सुरू केली. तसेच गटसचिवांना कारणे दाखवा नोटीस देवून जाब विचारण्यात आला आहे. शेतकºयांचे कुठलेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेवू.- अनिल गोस्वामीप्रभारी जिल्हा उपनिबंधक गोंदियाग्रीेन यादीत शेतकऱ्यांचा समावेश नसताना त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे कोणत्या आधारावर गटसचिवांनी सांगितले याची चौकशी सुरू केली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल.- सुरेश टेटेमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा बँक

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी