गोंदिया : प्रभागातील जागांच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यात केलेल्या दिरंगाईमुळे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी संबंधित वरिष्ठ लिपीकाला मंगळवारी (दि.५) शोकॉज नोटीस दिल्याची माहिती आहे. शनिवारी (दि.२) आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नगर परिषदेत पार पडला. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार येथीर प्रारूप प्रभाग रचना, पारदर्शक नकाशे व सदस्य संख्यांचे आरक्षण तपशील याबाबत हरकती व सूचना मागविण्यासाठी त्यांची प्रसिद्धी मंगळवारी (दि.५) करावयाची होती. मात्र संबंधीत वरिष्ठ लिपीक मुकेश मिश्रा यांनी याकामात दिरंगाई केली. परिणामी मुख्याधिकारी पाटील यांनी मिश्रा यांना मंगळवारी (दि.५) कारणे दाखवा नोटीस दिली. अगोदर प्रशासन अधिकारी व त्यानंतर आता लिपीकाला दिलेल्या शोकॉजमुळे नगर परिषदेत एकच खळबळ माजली आहे.(प्रतिनिधी)
न.प.च्या लिपिकाला दिली कारणे दाखवा नोटीस
By admin | Updated: July 6, 2016 02:13 IST