शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नेगेटिव्ह ब्लड ग्रुपचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. आता लॉकडाऊन नसल्यागत असतानाच नागरिकांमध्ये मात्र कोरोनाची दहशत आहेच. विशेष म्हणजे, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रक्तदानातूनही कोरोनाचा संसर्ग होणार अशी धारणा नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. परिणामी नागरिक रक्तदानासाठी घाबरत असल्याचे दिसत आहे. यामुळेच रक्तदान शिबिरांचे आयोजन घटले असून रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

ठळक मुद्दे ए,बी,एबी नेगेटिव्ह व एबी पॉझिटिव्ह ग्रुप नाहीच : शासकीय रक्त केद्रांत मोजकाच साठा

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  अवघे राज्य जेथे रक्ताच्या कमतरतेच्या समस्येने त्रस्त असतानाच शासनाकडून रक्तदान शिबिरावर भर दिला जात आहे. असे असतानाच येथील शासकीय रक्त केंद्रात ए,बी,एबी नेगेटिव्ह व एबी पॉझिव्व्ह ब्लड ग्रुपचा साठाच नसल्याचे शनिवारी (दि.१२) दिसून आले. तर अन्य ग्रुपच्या फक्त ५२ बॅग्सच असल्याची माहिती असल्याने जिल्ह्यातील रक्तकेंद्राची स्थिती ही फारशी बरी नसल्याचे दिसत आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. आता लॉकडाऊन नसल्यागत असतानाच नागरिकांमध्ये मात्र कोरोनाची दहशत आहेच. विशेष म्हणजे, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने रक्तदानातूनही कोरोनाचा संसर्ग होणार अशी धारणा नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. परिणामी नागरिक रक्तदानासाठी घाबरत असल्याचे दिसत आहे. यामुळेच रक्तदान शिबिरांचे आयोजन घटले असून रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हेच कारण आहे की, सध्याच्या स्थितीत अवघ्या राज्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून राज्य शासनाकडून रक्तदानासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील नागरिकही उपचारासाठी येथेच येत असून अशात रूग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांना येथील शासकीय रक्तकेंद्रातूनच रक्त द्यावे लागते. अशात येथील  रक्त केंद्रात रक्ताचा साठा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र असे असतानाही येथील शासकीय आजघडीला रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. शनिवारी (दि.१२) शासकीय रक्त केंद्रातील रक्तसाठ्याची पाहणी केली असता त्यात ए, बी, एबी नेेगेटिव्ह तसेच एबी पॉझिटिव्ह ग्रुपचे रक्त नव्हते. यावरून शासकीय रक्त केद्रांतही रक्ताचा तुटवडा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

रक्त केंद्रात ५२ बॅग्सचा साठा शनिवारी येथील शासकीय रक्त केंद्रात फक्त ५२ बॅग्सचा साठा होता. यामध्ये ए पॉझिटिव्हच्या १९ बॅग्स, बी पॉझिटिव्हच्या १२ बॅग्स, ओ पॉझिटिव्हच्या २- बॅग्स तर ओ नेगेटिव्ह ग्रुपची फक्त १ बॅग होती. मात्र हा साठा जिल्ह्यातील स्थिती बघता अत्यंत कमी असल्याने यात वाढ होण्याची गरज आहे. याकरिताच रक्त केंद्राकडून रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रक्त संकलनावर जास्त जोर दिला जात आहे. रक्तदान शिबिर हेच रक्तसाठा वाढविण्याचे एकमात्र माध्यम आहे. अशात नागरिकांनीही आता रक्तदानासाठी पुढे यावे असे रक्त केंद्र प्रमुख डॉ. संजय चव्हाण व जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांनी सांगीतले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी