सालेकसा : मानवी विकासात प्राथमिक शिक्षणाचे महत्व अधिक आहे. मानवी संस्काराची जळणघडण मुलांना प्राथमिक वयातच होणे गरजेचे आहे. याकडे शासनाने दूरदृष्टीपणे लक्ष देऊन शिक्षणाचा कायदा अंमलात आणला. जिल्ह्यात गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाला जिल्हा परिषदेने सुरू करून एका अभिनव उपक्रमाला सुरूवात केली. सध्या या योजनेचे तिसरे वर्ष सुरू आहे. मात्र या प्रकल्प योजनेला शाळा स्तरावर मुख्याध्यापकाकडून योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील १२० शाळांपैकी मोजक्याच शाळेत गावची शाळा आमची शाळा या उपक्रमांतर्गत कार्यक्रम राबवित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा सर्वागिण विकास होणार काय? असा पालक वर्गाला प्रश्न पडलेला आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनेत विद्यार्थी पालक व शिक्षकांचा सहभागाने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न चालविण्यात आली. या योजनेत अनेक उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आठही तालुक्यात सहयोगी तत्वावर विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाकरिता गावची शाळा आमची शाळा या शैक्षणिक गुणवत्ता वाढ प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. या प्रकल्प योजनेत जिल्ह्यातील उर्वरित सात तालुके सोडल्यास सालेकसा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२० शाळा या योजनेत सहभागी आहेत. मात्र या शाळामधून मोजक्याच शाळा प्रभावीपणे कार्यरत आहे. उर्वरीत शाळामधील मुख्याध्यापकांनी या योजनेच्या तपशिलवार माहितीलाच खो दिला आहे. गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पात लोक सहभागातून विद्यार्थी व शाळांची गुणवत्ता वाढ ध्येयपूर्तीसाठी शासन स्तरावरून जिल्ह्याला प्रोत्साहन देण्यात आले. यात लोक सहभाग शाळेतील पायाभूत सुविधा, भौतिक सुविधा, सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट्यपूर्ती, या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास साधण्याचे ध्येय शासनाकडून केले जात आहे. मात्र शासनाच्या सर्वागिण विकासाच्या योजनेला तालुक्यातील मुख्याध्यापकांनी प्रभावीपणे राबविता विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाला पाठ दाखविली आहे. त्यामुळे योजना पदरी पडूनही प्रभावीपणे शाळांमध्ये अंमलबजावणी होत नाही याला मुख्याध्यापकांची मानसिकता असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांचा अल्प प्रतिसाद
By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST