शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह विधान करणाऱ्याविरुद्ध दंड थोपटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:28 IST

प्रा.नामदेव जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगरपालिकेत कार्यरत शिक्षकांना संबोधून आक्षेपार्ह विधान केले. त्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाली.प्रा.जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार म.रा. प्राथमिक शिक्षक समितीने स्थानिक पोलीस ठाण्यात केली आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याची मागणी : म.रा. प्राथमिक शिक्षक समितीची पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : प्रा.नामदेव जाधव यांनी एका जाहीर कार्यक्रमात जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगरपालिकेत कार्यरत शिक्षकांना संबोधून आक्षेपार्ह विधान केले. त्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित झाली.प्रा.जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार म.रा. प्राथमिक शिक्षक समितीने स्थानिक पोलीस ठाण्यात केली आहे.शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे कार्य प्राथमिक शिक्षक अविरत करीत आहेत. यामुळे शिक्षकांना समाजात गुरुचे स्थान प्राप्त झाले आहे. समाज घडणीत शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. प्रा.नामदेव जाधव यांनी १८ फेब्रुवारीला एका जाहीर कार्यक्रमात शिक्षकांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यांनी शिक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्यात शिक्षकी पेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.हेतुपुरस्सर शिक्षकांना समाजात बदनाम करण्याचे वक्तव्य प्रा. जाधव करीत आहेत. त्यांचे हे विधान स्थानिक स्वराज्य संस्थाचे शिक्षकांचा उपमर्द करणारे आहे. या घृणित व आक्षेपार्ह विधानामुळे शिक्षकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक व कुचेष्टेचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या वक्तव्याविरुद्ध म.रा. प्राथमिक शिक्षक समितीने दंड थोपटले असून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. शिष्टमंडळात विनोद बडोले , रमेश गहाणे, कैलास हांडगे, सिद्धार्थ खोब्रागडे, विठोबा रोकडे, जी.पी. रामटेके, सुरेश ब्राम्हणकर, उमेश क्षीरसागर, विनोद चव्हाण,श्रीकृष्ण कोरे, जे.एस. मेश्राम, जितेंद्र ठवकर, अरुण फाये, प्रशांत चव्हाण, आर.एस.जांभुळकर, होमराज बहेकार, पी.एन. जगझापे, घनशाम बोंद्रेकर यांचा समावेश होता.

टॅग्स :Teacherशिक्षकPoliceपोलिस