गोंदिया : महाराष्ट्राचा सूर्योदय गोंदियातून होतो. त्यामुळे विधानसभेच्या विजयाची सुरूवात सुद्धा येथूनच होणार. गोंदिया विधानसभेची जागा शिवसेनाच लढणार असून १९९५ च्या इतिहासाला येथे उजाळा मिळणार, असे प्रतिपादन शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार दीपक सावंत यांनी केले. २१ आॅगस्ट रोजी येथील गुर्जर क्षत्रीय समाजवाडीत आयोजित सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संपर्क प्रमुख सतीश हरडे, विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, पूर्व विदर्भ सहसंपर्क प्रमुख चंद्रहास राऊत उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी आमदार रमेश कुथे, रमेश मिश्रा, रमेश तिवारी, जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे, विद्यार्थी सेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत ठवकर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गोंदियाची जागा शिवसेनाच लढणार
By admin | Updated: August 23, 2014 01:54 IST