गेल्या जून २०२० पासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गासह शाळा नोव्हेंबर २३ पासून सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात उपस्थित राहत नाही. ऑनलाइन शिक्षणप्रणालीतून विद्यार्थ्यांचे समाधान होत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक नाराज होते. त्या प्रणालीतून अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. निर्धारित असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साधारणत: ८ महिन्यांचा कालावधी लागतो. शासनाने एप्रिल २०२१ मध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. निवडक अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात याव्यात, तसेच ५० टक्के शाळा अंतर्गत शालेयस्तरावर मूल्यांकन देण्याची व्यवस्था मंडळाने करून परीक्षेतील अभ्यासक्रमाचे नियोजन करावे. या मागणीसह परीक्षा भर उन्हाळ्यात येत असल्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करून परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रा. नाकाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकावर शिक्षक भारती संघटनेचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST