शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

बिबट्याच्या पिलाने घेतला उंबराच्या झाडाचा आश्रय

By admin | Updated: March 26, 2015 01:08 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिचोली (जुनी) येथे तीन-चार महिन्याचा बिबट वाघाचा बछडा हेमराज परशुरामकर यांच्या घरावजळील...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिचोली (जुनी) येथे तीन-चार महिन्याचा बिबट वाघाचा बछडा हेमराज परशुरामकर यांच्या घरावजळील औंदुबराच्या झाडावर चढला. २५ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान शौचास जाण्याऱ्या लोकांच्या दृष्टीस पडले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच लोकांनी वाघ पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. त्यामुळे भितीपोटी वाघाचा बछडा झाडाला चिपकून बसला होता. गावातील लोकांनी बिनतारी संदेशावरून गोठणगाव वनपरिक्षेत्राचे क्षेत्राधिकारी गंगावणे यांना घटनेची माहिती देण्यात आली. वनक्षेत्राधिकारी गंगावणे लगेच घटनास्थळी वनविभागाच्या चमूसह दाखल झाले. त्यांनी औंदुबराच्या झाडावर चिपकून बसलेल्या बिबट वाघाच्या बछड्यांची पाहणी केली असता तो फार लहान असल्याने भितीमुळे झाडाला चिपकून आहे. त्या बछड्याच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही याची दखल घेत पिंजरा वगैरे मागविण्यची गरज नसून त्याला मोठ्या मेहनतीने कोणत्याही प्रकारची इजा न करता झाडाखाली उतरवून जंगलाच्या दिशेने सोडून देण्यात आले. त्याला जखम वगैरे असती तर उपचारासाठी ठेवावे लागले असते, असे वनपरिक्षेत्राधिकारी गंगावणे यांनी सांगितले. वाघाचा बछडा रात्रीलाच गावामध्ये आला असावा आणि गावातील कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्यांनी झाडावर चढून आश्रय घेतल्याचा अंदाज वनक्षेत्राधिकारी गंगावणे यांनी वर्तविला आहे. ज्या बिबट वाघांपासून हा बछडा सूटला ती वाघीन गावाशेजारीच तर नसेल या भितीने परिसरात वाघासंबधी दहशत पसरली आहे. या दहशतीची वनविभागाने दखल घेणे महत्वाचे आहे. (वार्ताहर)वाघिणीपासून पिल्लू दुरावलेचिचोली-जुनी परिसरात बिबट्याचा छावा झाडावर दडून असल्याची बातमी पंचक्रोशीत पसरताच बघ्यांनी या गावाकडे धाव घेतली. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी वडेगाव-बंध्या परिसरात कुत्र्यांनी अशाच एका छाव्याला पकडून ठार केले. या मृत छाव्याला मालकनपूर येथील नर्सरीमध्ये वनकर्मचाऱ्यांनी दहन केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. वाघीन व आणखी एका छाव्याला नवीन चिचोली, पुष्पनगर परिसरात बघितल्याचे काही लोक सांगतात. गोठणगाव-नवेगावबांध मार्गावर वाघीन व छावा दुचाकीस्वारांचा पाठलाग करीत असल्याचे सांगितले जाते. या सर्व घटनाक्रमांवरून बिबट वाघीणीपासून दोन छावे दूरावले व एक छावा तिच्यासोबत असल्याचा तर्क लावला जात आहे.