सडक-अर्जुनी : वनपरिक्षेत्र अधिकारी सडक-अर्जुनी अंतर्गत येत असलेल्या क्षेत्र सहायक कार्यालय सौंदड कार्यक्षेत्रातील गिरोला-हेटी, बिर्सी मार्गातील सातलवाडा गावाजवळ रात्री ९ वाजता वन कर्मचाऱ्यांच्या सर्तकतेमुळे सागवान चिरान चोरणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश आले.गेल्या अनेक दिवसांपासून सागवान तस्करांच्या मार्गावर असताना दि. ३ ला रात्री ९ वाजता आरोपी दलित अंबादास मेश्राम, सरदीप नंदकिशोर रंगारी दोन्ही सातलवाडा या आरोपींना आॅटो एमएच ३६-३६३० वाहनाने बिर्सी गावाकडे येत असताना एक दिवान पलंग व काही चिराण ०.१५४ मीटर (किंमत ११ हजार), आॅटो (किंमत अंदाजे ८० हजार) असा एकूण ९१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यावेळी वनक्षेत्र सहायक विलास बेलखोळे, वनरक्षक सुरेश मेंढे, श्यामकुवर वालोदे, विनायक नागरिकर, मुंगुल मारे, अरविंद बळगे, सुरेश काळबांधे, वनमजूर माणीक टेकाम, कृष्णा घरडे, रामदास मेश्राम आदी वनकर्मचारी उपस्थित होते. तपासात मुख्य तस्कर मिळण्याची शक्यता आहे. पुढील तपास वनरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)
सागवान जप्त; दोघांना अटक
By admin | Updated: September 5, 2015 02:18 IST