शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 20:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केला जात असताना आणि शासकीय सुटी असल्याचा फायदा ...

ठळक मुद्देमहसूल विभागाची डोळेझाक । रेतीमाफिया झाले सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केला जात असताना आणि शासकीय सुटी असल्याचा फायदा घेत रेतीमाफियांनी तालुक्यातील लिलाव न झालेल्या रेती घाटातून रेतीचा उपसा केल्याची घटना उघडकीस आली आहे.तालुक्यातील कोदामेडी येथील स्मशानभूमी जवळील चुलबंद नदीच्या पात्रातून सर्रासपणे रेती माफीया रेतीचा उपसा करीत असल्याचे चित्र आहे. महसूल विभागाकडून रेती घाटांचा लिलाव केला जातो. अनेक जण लाखो रुपये खर्चून रेती घाट घेतात. मात्र महसूल विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून घाट घेणाऱ्यांना सुद्धा आर्थिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाचे कर्मचारी काही विशिष्ट लोकांना टार्गेट करुन त्यांचीच वाहने पकडतात. दुसरीकडे लिलाव न झालेल्या रेतीघाटावर जेसीबी लावून रेतीचा अवैधपणे उपसा केला जात आहे.सध्या तालुक्यातील कोदामेढी, परसोडी, वळेगाव, बुद्धनगर, (घाटबोरी तेली, कोहळीटोला) कोहमारा, सिंदीपार, पळसगाव, पिपरी या घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे.आतापर्यत तालुक्यातील एकाच रेती घाटाचा लिलाव झाला आहे. काही रेतीघाटांवरुन रेतीचा अवैध उपसा होत असल्यास निश्चित कारवाई केली जाईल.-उषा चौधरी,तहसीलदार सडक अर्जुनीया मार्गाने कधी वाहन वाळूची वाहतूक करताना ही दिसत नाही. रेतीची अवैध वाहतूक करताना आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल.-के.आर.सांगोळे ,तलाठी ग्राम परसोडी

टॅग्स :sandवाळू