शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:17 IST

यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देविहिरी आटल्या, बोअरवेल बंद : टँकरद्वारे केला जातो पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पळसगाव-डव्वा येथे ग्रामपंचायत अंतर्गत जलस्वराज्याच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाण्याची पूर्तता होत होती. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे व विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे तसेच बोअरवेल बंद पडल्यामुळे गावकऱ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.पळसगाव येथे कुंभारटोली, माताटोली, मुंढरीटोला आणि पळसगाव असे चार टोले असून पाण्याची मोठीच समस्या निर्माण झाली आहे. समस्या माहिती होताच सरपंच डॉ.बी.एम. पटले, उपसरपंच हिरालाल चवरे, ग्रामपंचायत सदस्य सेवक बागळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुलाल रंगारी, मुकेश अग्रवाल, रामचरण राऊत, दिलीप कोल्हारे, सर्व सदस्य व गावकरी यांच्या प्रयत्नाने पाण्याचे टँकर लाऊन पाण्याची समस्या सोडविण्यात आली.अशी समस्या नेहमीच उद्भवत असल्याने ग्रामस्थ त्रस्त असून भीषण पाणी समस्या पुढे निर्माण होऊ शकते. याकरिता शासनाने लक्ष देवून मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये नाव समाविष्ट करुन गावांमध्ये नळयोजनेचा समावेश करावा व पाणी समस्या सोडवावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई