शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सत्तरीतील भागरथा करते अजूनही पंक्चर दुरूस्तीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST

आमगावच्या भवभूती नगरात राहणाºया भागरथा मनिराम फुंडे ह्या आजघडीला ६५ ते ७० वर्षाच्या आहेत. तरीही त्या आजही वाहनात हवा भरणे तसेच पंचर दुरूस्तीचे काम करतात. पती मनिराम फुंडे हे हवा व पंचर दुरूस्तीचे काम आमगाव-देवरी मार्गावर करीत होते. त्यांचे नाव आमगावात पंचर दुरूस्तीसाठी प्रसिध्दी असल्याने कामाचा व्याप पाहता पतीच्या कामात मदत करायला त्यांनी वयाच्या २६ वर्षी हा व्यवसाय सुरू केला.

ठळक मुद्देझाडीबोलीतच माहितीपट । राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पतीच्या व्यवसायाला हातभार लावता-लावता तेच तिच्या जगण्याचे साधन झाले. पुरूषांच्या बरोबरीने पंचर दुरूस्तीचे काम करणाऱ्या झाडीपट्टीतील भागरथाबाई फुंडे यांच्या कामाची दखल माध्यमांनी घेतली. पाहता पाहता तिच्यावर लघु माहितीपट तयार करण्यात आला. त्या माहितीपटाला अहमदनगर येथे १५ ते १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या १३ व्या प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात‘फुंडे हवा पंक्चर’ या माहितीपटाला ज्युरी अवॉर्ड देण्यात आला.आमगावच्या भवभूती नगरात राहणाºया भागरथा मनिराम फुंडे ह्या आजघडीला ६५ ते ७० वर्षाच्या आहेत. तरीही त्या आजही वाहनात हवा भरणे तसेच पंचर दुरूस्तीचे काम करतात. पती मनिराम फुंडे हे हवा व पंचर दुरूस्तीचे काम आमगाव-देवरी मार्गावर करीत होते. त्यांचे नाव आमगावात पंचर दुरूस्तीसाठी प्रसिध्दी असल्याने कामाचा व्याप पाहता पतीच्या कामात मदत करायला त्यांनी वयाच्या २६ वर्षी हा व्यवसाय सुरू केला. पतीसोबत काम करता-करता सर्व गोष्टी त्या शिकल्या. सोबत मुला-मुलींचा सांभाळही त्यांनी केली.याची दखल घेत लोकमतसह विविध वृत्तपत्रांनी व इलेक्ट्रानिक मीडियाने दखल घेत त्यांच्यावर स्टोरी तयार केल्या. यामुळे त्यांच्या प्रसिध्दीत आणखी भर पडली. त्यातच सालेकसा तालुक्याच्या कडौतीटोला येथे राहणारी तरूणी एल.प्रियंका (प्रियंका कोरे) हिने पुणे येथील माहिती आणि विद्यापीठात शिक्षण घेताघेता भागरथा फुंडे यांच्यावर माहितीपट तयार केला. या माहितीपटाचे छायाचित्रण रविराज अडसूळ यांनी केले. सलग २३ वर्षांपासून पंचर दुरूस्तीचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या भागरथा फुंडे यांच्यावर २२ मिनीटांचा माहितीपट तयार करून अहमदनगर येथे १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या १३ व्या प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर केला.एल. प्रियंका हिने तयार केलेल्या या पहिल्या माहितीपटाला पहिलाच अवॉर्ड मिळाला आहे. आता पुन्हा एल.प्रियंका दुसरे लघुचित्रपट झाडीपट्टीतच तयार करीत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक