शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्याच्या एकत्रित वीज बिलावर हप्त्यांचा तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

ग्राहकांची वीज बिलाबाबत ओरड वाढल्यानंतर आणि यासंबंधी तक्रारी वाढल्यानंतर महावितरणने यावर तोडगा काढला आहे. वीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित आलेले वीज बिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तीन हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. यासाठी एकूण बिलाच्या रक्कमेच तीन हप्ते करुन जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात ही रक्कम भरता येणार आहे.

ठळक मुद्देबिलातील त्रुटीवर मिस कॉलचा उपचार : वीज वितरण कंपनीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विद्युत वितरण कंपनीने कर्मचाऱ्यांना विद्युत मिटरची रिडिंग घेण्यासाठी घरोघरी पाठविणे बंद केले होते. जून महिन्यात स्थिती थोडी पूर्व पदावर आल्यानंतर मीटरची रिडिंग घेवून ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित बिल पाठविले. हे वीज बिल हाती पडताच अनेक ग्राहकांना धक्का बसला. त्यामुळे यावर ग्राहकांची ओरड सुरू झाली. यावरच तोडगा म्हणून आता महावितरणे ग्राहकांना चार महिन्याचे बिल भरण्यासाठी तीन हप्त्यांची सवलत दिली आहे.कोरोनामुळे मागील चार महिन्यापासून सर्वत्र उद्योगधंद ठप्प होते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर सुध्दा याचा परिणाम झाला. अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यातच महावितरणनेवीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रीत बिल पाठविले.या बिलातील आकडे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ग्राहकांमध्ये यावरुन बराच संभ्रम सुध्दा निर्माण झाला. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून वाढीव वीज बिलाच्या मुद्दावरुन संताप व्यक्त केला जात आहे.ग्राहकांची वीज बिलाबाबत ओरड वाढल्यानंतर आणि यासंबंधी तक्रारी वाढल्यानंतर महावितरणने यावर तोडगा काढला आहे. वीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित आलेले वीज बिल भरण्यासाठी आता ग्राहकांना तीन हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. यासाठी एकूण बिलाच्या रक्कमेच तीन हप्ते करुन जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात ही रक्कम भरता येणार आहे.एखाद्या वीज ग्राहकांने जून महिन्यात आलेल्या बिलाची रक्कम पूर्ण भरली असेल तर त्यांना दोन टक्के सूट दिली जाणार असून ही रक्कम पुढील महिन्याच्या वीज बिलात कपात केली जाणार आहे. शिवाय एखाद्या ग्राहकाला त्यांच्या विद्युत मीटर रिडिंगपेक्षा अतिरिक्त बिल आले असेल तर त्या सुध्दा दुरूस्ती करुन फरकाची रक्कम कमी करुन दिली जाणार आहे. विद्युत बिलात दुरुस्ती आणि वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना तीन हप्त्यांची सवलत देण्यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयाकडून सुध्दा निर्देश प्राप्त झाले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मिस कॉलवर होणार समस्यांचे निराकारणमहावितरणने वीज ग्राहकांना चार महिन्याचे एकत्रित बिल दिल्यानंतर यावरुन ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी आता महावितरणने मिस कॉलचा तोडगा काढला आहे. ग्राहकांनी ९८३३५६७७७७, ९८३३७१७७७७ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर महावितरणचे कर्मचारी संबंधित ग्राहकांना फोन करुन त्यांच्या तक्रारी ऐकून घेवून त्यावर तोडगा काढणार आहेत. तसेच वीज बिलात काही त्रृटी असल्यास त्या सुध्दा दूर करणार आहेत.पटेल यांनी केली होती अधिकाऱ्यांशी चर्चाचार महिन्याच्या वाढीव वीज बिलावरुन वीज ग्राहकांमध्ये संताप आहे. संपूर्ण जिल्हाभरातून यासंदर्भात ग्राहकांच्या तक्रारी आहेत. लोकप्रतिनिधीनींना सुध्दा यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहे. याचीच दखल खा. प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी (दि.६) विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची गोंदिया येथे बैठक घेवून चर्चा केली होती. तसेच ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावर तीन हप्त्यांचा तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर आता या संबंधिचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण