शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:42 IST

महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल.

ठळक मुद्देमहिला सक्षमीकरणाचा प्रयत्न : महिला बालविकास सचिवांच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल. त्यासाठी शहरातील जयस्तंभ चौकातील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या जागेवर महिला बचत गटांसाठी भव्य व्यापारी संकुल व सामाजिक कार्यासाठी सभागृह तयार करण्यात येणार आहे. याला राज्य सरकारने मंजुरी दिली असून लवकर कामाला सुरूवात केली जाणार असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.आ. अग्रवाल यांनी संदर्भात संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. तसेच बचत गटासाठी व्यापार संकुल उभारण्यासंदर्भात आढावा घेतला. कुडवा नाका परिसरात ४ कोटी रुपये खर्चून वनभवन तयार करण्यात आले आहे. यामुळे वनविभागाची शहरातील विविध ठिकाणातील कार्यालये आता एकाच ठिकाणी वनभवनात स्थापन केली जाणार आहे. आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे वनभवनाची भव्य इमारत उभरण्यात आली. त्यामुळे जयस्तंभ चौकात असलेल्या उपवनसंरक्षक कार्यालयाचे स्थानांतरण वनभवनात केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यापार संकुल उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे आणि महिला बालविकास सचिव हे देखील बैठकीला उपस्थित होते. आ. अग्रवाल यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण शक्य आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.या व्यापारी संकुलाचे काम जलदगतीने कसे पूर्ण करता येईल दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले. या वेळी त्यांनी जिल्हा ग्रंथालय शहराबाहेर असल्याने नागरिकांना तिथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे हे ग्रंथालय सुद्धद शहराच्या मध्यभागी आणण्याची गरज असल्याचे सांगितले. जयस्तंभ चौक येथे व्यापार संकुलासह सभागृह देखील उभारण्यात येणार आहे. यामुळे पंचायत समितस्तरीय कार्यशाळा, महिला बचत गटांचे मेळावे, विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यास सोयी होईल. महिला बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेदसिंगल यांनी आ.अग्रवाल यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले.यामुळे महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी काळे यांनी यासाठी प्रशासनातर्फे हे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले.बचतगटांसाठी कार्यशाळामहिला बचतगटांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांना हक्काची इमारत व व्यापार संकुल उपलब्ध होणार आहे. बचत गटातील महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मुंबई येथून उत्पादन व व्यापार क्षेत्रातील विशेषज्ज्ञांची कार्यशाळा गोंदिया येथे आयोजित करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी केली. यावर सचिव वेदसिंगल यांनी येत्या महिन्यात जिल्ह्यातील महिला बतच गटांसाठी कार्यशाळा आयोजीत करण्याचे निर्देश संबंधीतांना दिले. या कार्यशाळेत महिलांना रोजगारविषयक माहिती दिली जाणार आहे.