शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांसाठी तोडगा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:53 IST

धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत.

ठळक मुद्देधापेवाडा प्रकल्पातील पाण्याचे बॅक स्टोरेज : कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

आॅनलाईन लोकमतकाचेवानी : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या डॅममधील पाण्याच्या बॅक स्टोरेजमुळे मध्य प्रदेशातील चार गावे संकटात सापडली आहेत. यासाठी माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात सोमवारी कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दरम्यान दोन्ही राज्यांच्या संबंधित जिल्हाधिकाºयांशी बोलून त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले.दिलीप बंसोड यांच्या नेतृत्वात जि.प. सदस्य मनोज डोंगरे, कृष्णा भांडारकर, मुन्ना पटले, मध्यप्रदेशचे अजाब शास्त्री, उपसरपंच झनकार कडाऊ, राजेंद्र वानखेडे, दुर्योधन कोडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांची भेट घेण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी पंकज गेडाम, कनिष्ठ अभियंता एन.व्ही. अहिरराव उपस्थित होते.भोरगड, खैरी, कुंभली आणि टेमनी या चार गावांचे अंदाजे ९०० च्यावर शेतकरी धापेवाडा डॅमचे पाणी बॅक स्टोरेजमुळे ठप्प झाल्याने शेतात जावू शकत नाही. परिणामी एक महिन्यापासून धान कापणी करण्यात आली. पण शेतात कोणतेही साधन जात नसल्याने सर्व धान पीक शिवारात पडून आहे. शेतातील धानाची नासाडी होत असून काही दिवसांनी एक दानाही हाती लागणे कठीण आहे, असे कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांना सांगण्यात आले.धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प तिरोडा येथील पाणी पिण्याकरिता उपयोगात यावे किंवा पिण्याच्या पाण्याची पातळी टिकून राहावी, याकरिता प्रकल्पात पाणी स्टोरेज केले जात आहे.याचा दुष्परिणामामुळे चारही गावांच्या शेतकºयांना नदी ओलांडून जाता येत नाही. नदीला लागून असलेल्या नाल्यांना थोप असल्यामुळे शेती संबंधित साधन व लोकांना जाणे कठीण झाले आहे.या वेळी माजी आ. बंसोड यांनी, धापेवाडा प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचा स्टोरेज करण्यापूर्वी भोरगड, खैरी, कुंभली आणि टेमनी या गावांच्या ग्रामपंचायतींना सूचना देणे गरजेचे होते. असे बोलून महाराष्ट्र राज्यात पाण्याची टंचाई भागविण्याकरिता दुसºया राज्याच्या जनतेवर अन्याय करु शकत नाही. तातडीने उपाययोजना करा. दोन्ही राज्याच्या संबंधित जिल्हाधिकाºयांना विश्वासात घेवून तत्काळ व्यवस्था करायला सांगा किंवा आपण स्वत: करा, असे बजावून सांगितले.यावर कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके यांनी तत्काळ दोन्ही जिल्हाधिकाºयांना मिळून व्यवस्था कशी करता येईल, याबाबत कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.याप्रसंगी बोलेश बिजेवार, राकेश चौरीवार, राजकुमार कावळे, महेश लिल्हारे, शंकर बारेवार, सोमा पगरवार, नारायण लिल्हारे, नान्हू लिल्हारे, गणपत ठवकर, लोकेश्वर कोडेश्वर, लिखीराम लिल्हारे, रविंद्र लिल्हारे, मोरेश्वर कोडेश्वर, रामेश्वर लिल्हारे, बालाराम राऊत, मनोज कोडेश्वर व नारायण कोडेश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.नदीच्या दोन्ही तिरावर मजबूत बांधकाम करण्यात यावे. तसे झाल्यास रेताळ जमिनीमुळे किनारपट्टी वाहून जाणार नाही. तसेच कायमस्वरुपी पूल तयार करण्यात यावे, अशी मागणी माजी आ. दिलीप बंसोड व अजाबराव शास्त्री यांनी कार्यकारी अभियंता फाळके यांच्याकडे केली.