राजेंद्र जैन : ८५७ अपंगांना साहित्य वाटपगोंदिया : मनोहरभाई पटेल अॅकेडमी व दिशा संस्थानची विविध सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका राहते. यात हृदयरोग व अपंगांचे शिबीर, सामुहिक विवाह सोहळा यासारख्या महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. शिवाय संस्था लोकांच्या मदतीसाठी नेहमीच प्रयत्नरत राहते. मात्र अपंगांची सेवा हीच खरी सेवा आहे. माजी मंत्री प्रफुल पटेल व अॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांचीही हीच विचारधारा असल्याने भविष्यात असे कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न घेतले जाईल असे प्रतिपादन आमदार राजेंद्र जैन यांनी केले. मनोहरभाई अॅकेडमी, दिशा संस्था, एल्मिको व ओएनजीसीच्या संयुक्त वतीने ८ डिसंबर रोजी मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित अपंगांच्या साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला दिशा कुटीरचे संस्थापक डॉ. देवाशिष चॅटर्जी, डॉ. यादव कुदळे, एल्मिकोचे उप व्यवस्थापक राजेश दुबे, आर.एस.दास, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष शिव शर्मा, महामंत्री मनोहर चंद्रिकापुरे,जिल्हा परिषद सदस्य राजलक्ष्मी तुरकर, गंगाधर परशुरामकर, अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. राठोड व अन्य उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी दिशा संस्थेचे अध्यक्ष डॉ. चॅटर्जी यांनी, अॅकेडमी व दिशा संस्थेच्या माध्यमातून माजी मंत्री पटेल यांच्या मार्गदर्शनात असे उपक्रम सतत घेतले जाणार असल्याचे मत आपल्या प्रास्तावीकातून मांडले. तर एल्मिको चे उप व्यवस्थापक दुबे यांनी, अॅकेडमी, दिशा संस्था व ओएनजीसीच्या सहकार्याने हे कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात निवड करण्यात आलेल्या ८५७ अपंगांना कृत्रिम हात, पाय, अन्य अवयव, केलीपर्स, ट्रायसिकल, व्हील चेयर्स, कर्णयंत्र, स्टीक्स व अन्य साहित्यांचे वाटप करण्यात आले. यात मतिमंदांसाठी अत्यंत उपयोगी सी.पी. चेयर व खऱ्या हातासारख्या उपयोगात येणाऱ्या कृत्रिम हाताचा समावेश होता. या कार्यक्रमाचे संचालन रवी मुंदडा यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. लता जैन, डॉ. संजय भगत, डॉ. चंद्रशेखर राणा, अखिलेंद्र मौर्य, शरद बिल्लोरे, विवेक गुप्ता, प्रा. देवेंद्र पांडे, प्रा. जगदीश अग्रवाल, प्रा. हितेश जोशी, प्राचार्य मृत्यूंजय सिंग, राजकुमार जैन, अस्सु दवे, हरीचंद मोटवानी, नानु मुदलीयार, विनोद अग्रवाल, दयानंद कटरे, कुमार पलन, राकेश गुप्ता आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
अपंगांची सेवा हीच खरी सेवा
By admin | Updated: December 8, 2014 22:36 IST