गोंदिया : येथील आधार महिला शक्ती संघटनेच्यावतीने नुकतेच येथे महिलांचे आरोग्य या विषयावर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागपूरचे डॉ. कालीदास परशुरामकर, सोनाली देशपांडे, डॉ. निर्मला जयपुरिया, सिमा डोये, मृदुला वालस्कर, वंदना नेचवानी, प्रा.सविता बेदरकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. परशुरामकर यांनी वयोमानानुसार महिलांमध्ये निर्माण होणारे त्रास व आजार तसेच त्यावर उपाय याबद्दल मार्गदर्शन केले. तर उपस्थित अन्य पाहुण्यांनीही महिलांवरील अत्याचार, पारिवारीक समस्या, महिला गृह उद्योग आदी विषयांवर मार्गदर्शन करीत महिलांना एकत्रीत होऊन पुढे येणे आजची गरज निर्माण झाल्याचे सांगीतले. या कार्यक्रमात सुमारे ५०० हून अधिक महिलांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन सुजाता बहेकार व शिल्पा मटाले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.मयुरी कोतवाल यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रृती केकत, प्रिया सावंत, सुनिता हेमणे, वंदना घाटे, रूपाली शिंदे, निलु फुंडे, दीपा काशिवार, गौरी शर्मा, सिमा जाधव, मंजू जगताप, पुजा तिवारी, शिवानी चव्हाण, कृपा कदम यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
महिलांच्या आरोग्यावर चर्चासत्र
By admin | Updated: July 20, 2014 00:00 IST