राजकुमार बडोले : मुद्रा बँक योजना मेळावा व गृहोपयोगी विक्र ी केंद्राचा शुभारंभ गोंदिया : महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी बँकांनी आता बचतगटांच्या महिलांना वैयिक्तकरीत्या मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करु न द्यावे, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. तिरोडा येथील विक्री केंद्रात सोमवारी (दि.२७) महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्तवतीने बचतगटांच्या महिलांचा मुद्रा बँक योजना मेळावा व गृहोपयोगी वस्तू विक्री केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, पं.स.सभापती उषा किंदरले, उपसभापती किशोर पारधी, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी एच.एस.मानकर, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, उपनगराध्यक्ष सुनिल पालांदूरकर, पं.स.सदस्य अंबुले, पं.स.माजी सभापती बंडू सोनेवाने, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे उपस्थित होते. पुढे बोलताना बडोले यांनी, बचतगटांच्या महिलांना कर्ज देण्यासाठी बँकांची भूमिका आजही सकारात्मक दिसत नाही. राष्ट्रीयकृत बँकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज प्रकरणे करण्याचे दिलेले उद्दिष्ट किती साध्य झाले आहेत याची माहिती बँकांनी उपलब्ध करुन दयावी. बँका मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असतील तर त्यांच्यावर निश्चितच कार्यवाही झाली पाहिजे. बचतगटांच्या माध्यमातून मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. महिला बचतगटाने उत्पादित केलेल्या वस्तू सर्वांनी खरेदी केल्या पाहिजे तरच बचतगटाने उत्पादित केलेल्या वस्तूला चांगली बाजारपेठ मिळेल व त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे सांगीतले. आमदार रहांगडाले यांनी, महिला बचतगटांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. महिला बचतगटांनी चांगले काम करु न तिरोडा तालुक्याच्या विकासाला हातभार लावावा. मुद्रा बँक योजनेबाबत लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करु न जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना कर्ज मिळवून देवून त्यांना स्वयंरोजगार करण्याची संधी उपलब्ध करु न दयावी असे मत व्यक्त केले. श्रीवास्तव यांनी, मुद्रा बँक योजनेबाबत जिल्ह्यातील बँकांना जे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यापैकी ९३ टक्के उद्दिष्ट २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्हा मुद्रा योजनेच्या कर्ज वाटप प्रकरणात दुसऱ्या क्र मांकावर असल्याचे सांगीतले. प्रारंभी मान्यवरांनी परिसरात लावण्यात आलेल्या बचतगटाच्या विविध स्टॉलला भेट दिली. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या गृहपयोगी विक्र ी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वयंसहायता महिला बचतगटाचे २६ स्टॉल्स, प्रबुध्द विनायती कल्याणकारी संस्था फुलचूर(गोंदिया) यांचे सिकलसेल व हिमोग्लोबीन आरोग्य चाचणीचे स्टॉल व जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी मांडले. संचालन सनियंत्रण व मुल्यमापन समन्वयक सविता तिडके यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सहायक नियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, तालुका कार्यक्र म व्यवस्थापक शिल्पा येळे, उपजिविका सल्लागार प्रितम पारधी, रेखा रामटेके, सारिका बंसोड, चित्रा कावळे, अनिता आदमने, विनोद राऊत, सुनील पटले यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) चित्ररथाचा शुभारंभ व महिलांचा सन्मान पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील बँका, महत्त्वाच्या ग्रामपंचायती, तहसील कार्यालय, पंचायत समिती व अन्य शासकीय कार्यालये अशा ३०० ठिकाणी लावण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती असलेल्या फोमशीटचे, विविध आकारातील भित्तीपत्रक व पॉम्पलेट्सचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या युक्ती ग्रामसंस्था खेडेपार, संजीवनी ग्रामसंस्था जमुनीया, नवचेतना ग्रामसंस्था अर्जुनी यांना प्रत्येकी तीन लक्ष रु पये तर प्रेरणा ग्रामसंस्था भिवापूर, स्वावलंबन ग्रामसंस्था सातोना यांना प्रत्येकी ७५ हजार रु पये जोखीम प्रवणता निधी, गौतमबुध्द ग्रामसंस्था वडेगाव, संबोधी ग्रामसंस्था वडेगाव, शारदा ग्रामसंस्था खोडगाव यांना प्रत्येकी १५ हजार रु पये फिरता निधी पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. समृध्दी ग्रामसंस्था खुर्शीपार, तेजस्वीनी ग्रामसंस्था घाटकुरोडा व प्रगती ग्रामसंस्था गोबाटोला यांनी गावे हागणदारी मुक्त केल्याबद्दल बेलाटी येथील रमाबाई आंबेडकर बचतगट, कवलेवाडा येथील शिवानी बचतगट, बरबसपुरा येथील शुभलक्ष्मी बचतगट यांनी सर्वाधिक कर्ज घेतल्याबद्दल, उत्तम समुदाय साधन व्यक्ती म्हणून ठाणेगाव प्रभागच्या उर्मिला पटले, कवलेवाडा प्रभागच्या अरु णा डोंगरे, वडेगाव प्रभागच्या शारदा बघेले, अर्जुनी प्रभागच्या माया मराठे, सुकळी प्रभागच्या सुलोचना येळे, सेजगाव प्रभागच्या सिंधू भगत, सरांडी प्रभागच्या भाग्यश्री पटले यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात सर्वप्रथम नोंदणीकृत सुकळी येथील तेजप्रवाह लोकसंचालित साधन केंद्राच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.
बचतगटांच्या महिलांना स्वावलंबी करा
By admin | Updated: March 29, 2017 01:24 IST