शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

धान केंद्रावरील धानाला फुटले अंकुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये याकरीता धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र गोरठा केंद्रावरील नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांचे धान पावसात भिजले.

ठळक मुद्देखरेदी केंद्राचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांचे नुकसान, अनेक शेतकऱ्यांनी परत नेले धान

मुरलीधर करंडे।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : जिल्ह्यात गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाला बसला. तालुक्यातील गोरठा येथील शासकीय धान खरेदी केंद्रावरील अनेक शेतकºयांचे धान भिजल्याने धानाला अंकुर फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रावरुन धान परत नेण्याची वेळ आली.खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. मात्र तेच शेतकऱ्यांना अंकुरीत झालेला धान स्विकारता येणार नाही असे सांगून परतावून लावत आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये याकरीता धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र गोरठा केंद्रावरील नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांचे धान पावसात भिजले. शुक्रवारी (दि.७) सकाळी झालेल्या पावसामुळे जवळपास सात हजार पोते धान पावसात भिजले. २२ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान गोदाम फुल्ल झाल्यामुळे खरेदी बंद होती. त्यामुळे मागील एक महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान परतीच्या पावसात भिजत राहिले. परिणामी अनेक शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहे.हे अंकुरीत धान व ओले धान आम्ही घेणार नाही अशी भूमिका धान खरेदी केंद्राने घेतली आहे. त्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. धान खरेदी करण्यात केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी उशीर केला. यात आमचा काय दोष अशी संतप्त प्रतिक्रिया धान खरेदी केंद्रावर उपस्थित शेतकऱ्यांनी दिली. आम्ही आपले दैनंदिन काम सोडून दररोज केंद्रावर येतो. परंतु आपण शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता व्यापाºयांचे धान खरेदी करीत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला.सात हजार धानाचे पोते भिजलेजिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या गोरठा येथील धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेले सात हजार पोते धान गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भिजले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या धानाची नुकसान भरपाई कोण देणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.सुरक्षाविषयक सुविधांचा अभावआमगाव तालुक्यातील आमगाव, गोरठा, कालीमाटी, तिगाव, अंजोरा, कट्टीपार या सहा केंद्रावर धान खरेदी करण्यात येते. या केंद्रावर शेतकºयांचा धान खरेदी करण्याकरीता पुरेशा गोदामाची व्यवस्था नसल्यामुळे अनेक दिवस धान खरेदी केंद्राबाहेर पडून असतो. आधारभूत धान खरेदी केंद्रावर सुरक्षा भिंत नसल्यामुळे मोकाट जनावरे परिसरात येतात व धानाची पोती फाडतात व धान खराब करतात त्याचा फटकाही शेतकºयांना बसतो.शासकीय धान खरेदी केंद्रावरुन सुरू असलेल्या सावळा गोंधळाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव धान खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री करण्याची पाळी येते. तर खरेदी केंद्रावरुन कधी धानाची चोरी सुध्दा होते.- सुरेश हटवार,रा. खुर्शीपार, शेतकरीकेंद्र संचालकांनी धानाला अंकुर आल्यामुळे धान परत नेण्याकरीता सांगितले आम्ही दहा दिवसांपासून धानाची विक्री करण्यासाठी पायपीट करीत काटा करण्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांमुळे विलंब झाला यात आमचा काय दोष.- सुरेंद्र हरिणखेडे, माजी सरपंच दहेगावशासकीय आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाच्या प्राधान्य न देता व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.- डाकचंद हिरदीलाल पटले, रा.चिरचाळबांध,पंधरा दिवसांपासून धान खरेदी केंद्रावर सतत फेऱ्या मारतोय पण आमच्या धानाची खरेदी करण्यात आली नाही. शेवटी धान पावसात भिजले.- रतनलाल रिनाईत,चिरचाळबांध२२ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान गोदामातून धानाची उचल झाली नाही. त्या दरम्यान केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यास उशीर झाला व परतीच्या पावसाने नियोजन बिघडले.- हेमराज सुलाखे, केंद्र संचालक गोरठा

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी